Jump to content

पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३)


 "पैगंबरांनी या जगांत समता व बंधुता याची शिकवण कशी दिली व अमलांत कशी आणली हे समजण्याकरितां या पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे.”

- समाचार, मुंबई


 " पैगंबर यांचें हें छोटे पण मनोरंजक चरित्र मराठीत लिहून मि. ..अमीन यांनी मराठी वाचकांना ऋणी करून ठेविलें आहे. लेखक इस्लाम- घर्मीय असूनही त्यांनीं लिहिलेली मराठी भाषा अत्यंत सोपी, सोज्वल व रसाळ आहे. "

चित्रा, मुंबई


 "पुस्तकांतील कथाभाग अत्यंत स्फूर्तिजनक आहे.”

- ज्ञानमंदिर, मुंबई


 "इतक्या उदार वृत्तीनें व पूर्वग्रहरहित दृष्टीनें पैगंबर चरित्र लिहून मि. सय्यद अभीन यांनीं धार्मिक वाङ्मयांत उत्कृष्ट पुस्तकाची भर घालून महाराष्ट्रीय वाचकांस उपकृत करून ठेविलें आहे."

- महाराष्ट्र शारदा, मुंबई


 या चरित्रांतील ओघवती भाषा, पाहून मनास फार आल्हाद होतो व त्यामुळे चरित्र-नायकाच्या चारि- त्र्याचा पुस्तक वाचीत असतां मनावर अत्यंत इष्ट असा परिणाम होत जातो. "

- सुबोध पत्रिका, मुंबई


 "अभ्यासपूर्वक लिहिलेल्या या सविस्तर चरित्राने मराठी वाङ्मय एक चांगलीच भर पडली आहे. "

- केसरी, पुणे


 "पुस्तक सुरुवातीपासून अखेरपर्यंत वाचण्यासारखें आहे."

- क्रॉनिकल, मुंबई