पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२६
इस्लाम आणि संस्कृति


झालेले आहात. तुम्ही सत्याचा पुरस्कार व अन्यायाचा धिक्कार करणारे असून परमेश्वरावर अढळ विश्वास ठेवणारे आहांत.”

- पवित्र कुराण ३:१०९

 इस्लामचे ध्येयवाक्य वरील ऋचेमध्यें घोषित केलें आहे. इस्लाम- च्या अनुयायांवर, मुस्लिमांवर मानव कल्याणाची केवढी मोठी "जबाबदारी आहे याचा त्यांनीं अवश्य विचार केला पाहिजे. म्हणजे जात्यंथ, हटवादी, संस्कृतिहीन असा दोषारोप केला जातो तो किती असत्य आहे हे त्यांनी स्वतःच्या वागणुकीनें सिद्ध केलें 'पाहिजे.
 मानवी संस्कृतीचा वारसा आपणांस मिळाला आहे; त्या संस्कृतीमध्ये आणखी मोलाची भर घालण्याचें पवित्र कार्य आपणास करावयाचें आहे याचे स्मरण मुस्लिमांनीं सतत ठेविलें पाहिजे. मानवता हा संस्कृतीचा गाभा मानला जातो; आत्मा समजला जातो. तिला संपन्न करण्याचें पुण्यकार्य प्रत्येक मुस्लिमानें केलें पाहिजे. सत्य व न्याय ह्रीं मानवतेचीं मूलभूत अंगें त्यानें आत्मसात केलीं पाहिजेत. कोणत्याही आमिषास किंवा स्वार्थास बळी न पडतां, कोणत्याही धाकदपटशास भीक न घालतां त्यानें आपलें आचरण : शुद्ध ठेविलें पाहिजे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिमाचा .. परमेश्वरावर अढळ विश्वास पाहिजे. परमेश्वरावर विश्वास याचा अर्थ, परमेश्वराचे जे महान गुणधर्म आहेत त्यांचा स्वतःमध्यें आविष्कार असें मागील एका प्रकरणांत केलेला आहेच. या विश्वासामुळे मनुष्य विवेकी, सदाचारी व त्यागी बनतो, त्याच्यां अंतःकरणांत प्रेम व दया पालवते, उदात्त भावना ओसंडून निघतात, केवळ आपल्या जातीकडे न पाहतां सर्व जगाकडे, मानवजातीकडे आत्मीयतेनें