पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्कृतीचें सारसर्वस्व

२२५

या पापांतून मुक्त होण्याकरितां परमेश्वराचें भजन पूजन करावयाचें ! अ शनें कां परमेश्वर कधीं संतुष्ट होईल ? मानवांवरील अन्याय मग तो कोणत्याही स्वरूपांत असला तरी अक्षम्य आहे आणि असा अन्याय करणाऱ्या माणसाबद्दल परमेश्वराला प्रेम व आपुलकी वाटणें शक्य नाहीं. परमेश्वर दिव्यचक्षु आहे; भक्तीचा अवास्तव पसारा व डामडौल तो बरोबर ओळखतो. दिखाऊ भक्ति आणि खरी भक्ति यांमधील भेद त्याला स्पष्ट दिसतो. मानव्याला हरताळ फासणाऱ्या व्यक्तीनें कितीही परमेश्वराची प्रार्थना केली तरी परमेश्वर त्याकडे ढुंकून देखील पाहत नाहीं. परमेश्वर मानवसेवेचा भुकेला आहे. मानवांची सेवा करणारास तो आपला भक्त समजतो. ज्याच्यावर संकटें कोसळत आहेत, जे अन्यायाने पिचून निघत आहेत, जे प्रत्यहीं अत्याचाराला बळी पडत आहेत, जे उपासमारीनें तडफडत आहेत अशांच्या साहाय्याला धांवून जाणारा आणि त्यांच्या दु:खाचा परिहार करण्याकरितां अटोकाट प्रयत्न करणारा हाच खरा परमे - श्वराचा भक्त; मानवसेवा हीच परमेश्वराची सर्वश्रेष्ठ भक्ति.

" जो मानव जातीचें कल्याण करतो तो सर्वश्रेष्ठ होय, "


- हजरत मुहम्मद पैगंबर


 मानवांचें कल्याण हेंच आपले ईप्सित मानणाऱ्या सद्गृहस्थास इस्लामनें श्रेष्ठ स्थान दिले आहे. मनुष्याचें श्रेष्ठत्व त्याच्या कुल- · शीलावर किंवा गर्भश्रीमंतीवर अवलंबून आहे असें इस्लाम मुळींच मानीत नाहीं. मानवांची सेवा, मानवांचें कल्याण हीच श्रेष्ठत्वाची कसोटी आहे असें तो मानतो.

"मानवजातीच्या कल्याणाकरितां तुम्हीं ( मुस्लिम ) निर्माण


इ.सं. १५