पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२४
इस्लाम आणि संस्कृति


आपली भाषा, संस्कृति वेगवेगळी असली, आपला धर्म वेगवेगळा असला तरी आपण सर्व एककुटुंबीय आहोत, आपणांमध्ये कोणताही भेदभाव नहीं ही विशाल भावना आपण मनामध्ये पाहिजे अशी इस्लामची शिकवण आहे.

 सर्व प्राणिमात्र है परमेश्वराचें कुटुंब केलेल्या प्राणिमात्रांचे कल्याण करण्याची जो परमेश्वराचा अत्यंत आवडता माणूस होय. "

- हजरत मुहम्मद पैगंबर


 आपल्या कुटुंबियांच्या स्वास्थ्याकरितां विलक्षण परिश्रम कर- णाऱ्या सुपुत्राविषयीं बापाला केवढा अभिमान वाटतो, केवढी आपुलकी वाटते, केवढे प्रेम वाटतें ! सारें विश्व हें माझें कुटुंब आहे या भावनेनें मानव जातीकरितां चंदनासारखा आपला देह झिज- विणाऱ्या सद्गृहस्थाबद्दल परमेश्वरास तशीच आपुलकी, तसेंच प्रेम वाटतें. आपला स्वार्थ, आपलें सुख, आपला मोठेपणा बाजूला ठेवून निरलसपणे मानवतेची सेवा करणारा गृहस्थ परमेश्वराचा अत्यंत आवडता मनुष्य समजला जातो.

मानवांची सेवा ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ भक्ति होय."


- हजरत मुहम्मद पैगंबर


 परमेश्वराची भक्ति करण्याचे अनेकविध प्रकार आज जगतांत रूढ आहेत. प्रत्येक मनुष्य आपल्या बुद्धीप्रमाणें त्याची पूजाअर्चा करतो, त्याला आळवितो. शेजाऱ्यापाजाऱ्यांना छळावयाचें, जनतेची पिळवणूक करावयाची, राजरोस अन्यायानें वागावयाचें, स्वतःच्या फायद्याकरितां दुसऱ्यावर जुलुमजबरदस्ती करावयाची आणि नंतर