पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्कृतीचें सारसर्वस्व

२२३

यश मिळविलें आहे. एच्. जी. वेल्स नांवाचे जगद्विख्यात ग्रंथकार लिहितात, 46 पूर्वी जगामध्यें कधींही आढळून न येणारा आणि सार्वत्रिक क्रूरता व जुलूम जबरदस्ती यांपासून मुक्त असलेला समाज इस्लामनें निर्माण केला. " + एडवर्ड गिबननें आपल्या " Decline and Fall of the Roman Empire " ग्रंथांत वरील विधानास पुष्टी देणारे उद्गार काढले आहेत. " त्यांनी ( मुहम्मद पैगंबर ) जनतेमध्यें स्नेह व औदार्याचें तेज निर्माण केलें, सामाजिक सद्- सूडाच्या भावनेस गुणांचा पुरस्कार केला, नियम व तत्त्वप्रणालीनें पायबंद घातला."*
 आपल्या तत्त्वज्ञानानें इस्लामनें एकमेकांच्या रक्तास चटावलेल्या अनेक टोळ्या व जमातींमध्यें सहकार्य, प्रेम आणि एकोपा निर्माण केला आणि त्यांची वायां जाणारी शक्ति, पराक्रम व बुद्धिमत्ता मानवतेच्या महान कार्यावर केंद्रीभूत केली. अखिल मानवजातीचा उगम एकच आहे; संबंध मानवजात एक विश्वव्यापी कुटुंब आहे असा पुकारा करून इस्लामनें विश्वबंधुत्त्वाचा मार्ग अधिक सुकर केला.
 "आम्ही तुम्हांस एकाच स्त्रीपुरुषां ( आईबापां ) पासून निर्माण केले आहे."

- पवित्र कुराण ४९:१३


 जगांतील सर्वत्र पसरलेल्या मानवांची उत्पत्ति एकाच आईबापा- पासून झाल्यामुळे यच्चयावत् मानवांबद्दल आपणांमध्यें सहोदराची भावना आली पाहिजे. आपण निरनिराळ्या देशांत राहत असलों,


+ Outline of History, P. 325.


*Historian's History of the World, Vol. 8, P. 144.