पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२२
इस्लाम आणि संस्कृति

णाऱ्या आपल्या जमातीला मदत करतांना मरणारा गृहस्थ आमच्यापैकी नव्हे."

- हजरत मुहम्मद पैगंबर


 मुस्लिमाची परमेश्वरावर अढळ निष्ठा असल्यामुळे परमेश्वरासन आवंडणाऱ्या गोष्टी करणारा मनुष्य मुस्लिम या नांवास पात्रच होत नाहीं. स्वतः दुसऱ्यावर जुलूम करणारा किंवा तो करण्यास दुसऱ्यास मदतीला बोलावणारा गृहस्थ मुस्लिम होऊ शकत नाहीं. त्याचप्रमाणें जुलूम किंवा अनाचार करणाऱ्या पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारा मनुष्यही मुस्लिम म्हणविला जाणार नाहीं. मुस्लिम कोणास म्हणावें याचे स्पष्टीकरण पवित्र कुराणमध्यें सांपडतें.
 "न्याय व चांगुलपणा या बाबतींत दुसऱ्यांना मदत करा; अन्याय आणि दुष्टपणाच्या बाबतींत मदत करूं नका.

पवित्र कुराण ५:२


 न्याय व योग्य गोष्टींबद्दल श्रद्धा बाळगणारा व त्याकरितां दुसऱ्यांना मदत करणारा गृहस्थ मुस्लिम म्हणÎ शकतो. त्याच्या हातून कोणतेंहीं अपकृत्य, कोणताही अन्याय, कोणतेंही दुष्ट कृत्य घडता कामा नये किंवा त्या बाबतींत त्याचें इतरांना सहाय्यही होता कामा नये. जें सत्य, शिव आणि सुंदर असेल त्याचाच पुरस्कार करणारा गृहस्थ इस्लामचा अनुयायी होऊं शकतो.
 इस्लामच्या या उदात्त मनप्रणालीमुळे जगांत सर्रास व राजरोस चाललेल्या अत्याचारास व सूड बुद्धीस पायबंद बसला आणि त्यामुळे मानवतेचा मार्ग अधिक सुकर झाला. क्रूरता आणि जुलूम यांपासून अलिप्त राहणारा समाज तयार करण्यांत इस्लाम अपूर्व