पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्कृतीचें सारसर्वस्व

२२१

आला. या आदेशामागील मनाच्या मोठेपणास जगांत तोड मिळणे शक्य नाहीं. परधर्मियांकडून मुस्लिमांचा अत्यंत क्रूरपणें छळ करण्यांत आला, त्यांना उपद्रव देण्यांत आला, त्यांना शिव्याशाप वाहण्यांत आले, इतक्यावरही संतुष्ट न होतां इस्लामचें अस्तित्त्वही नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू झाला. एवढा छळवाद व उपहास होत असतां त्याचा बदला कसा घ्यावा याबद्दलचा इस्लामची आज्ञा काय आहे असें म्हणाल तर अशा जुलमी प्रतिपक्षीयांबद्दल मुस्लिमांनीं अपशब्द देखील बोलतां कामा नये ही होय. "
 " एकाद्या जमातीच्या द्वेषामुळे अन्यायाने वागूं नका, न्यायानें वागणें ही ईश्वरभक्तीच्या खालोखाल महत्त्वाची गोष्ट आहे."

- पवित्र कुराण ५:८

 एकाद्या जमातीबद्दल किंवा पक्षाबद्दल केवळ द्वेष आहे म्हणून त्याच्यावर जुलूम जबरदस्ती करणें, त्याची अपशब्दानें संभावना करणें, त्याला न्याय्य वाटणारी गोष्ट पायदळी तुडविणें, त्याच्या विचारांचा कोंडमारा करणे इत्यादि गोष्टी अन्यायाच्या असल्यामुळे त्यांपासून मुस्लिमांनीं परावृत्त झालें पाहिजे. कोणताही भेदभाव न ठेवतां त्याच्याशीं न्यायाने वागणें हें आपलें पवित्र कर्तव्य आहे असे मानले पाहिजे. न्यायवृत्ति हा परमेश्वराचा एक गुणधर्म असल्यामुळे त्याचें परिपालन करणें म्हणजे परमेश्वराला संतुष्ट करणें, त्याची भक्ति करणें होय.

 "जुलूम करण्याकरितां दुसन्याची मदत मागणारा किंवा आपल्या जमातीकरितां अन्यायाने झगडणारा किंवा अनाचार कर-


*The Holy Quran by Mohamed Ali, M. A., P. 570.