पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२०
इस्लाम आणि संस्कृति

मुस्लिम राजवटीत झाला. हजरत मुहम्मद पैगंबरांची उदात्त शिक वण प्रत्यक्षांत उतरली. सर्व जगानें, विशेषतः मुस्लिमांनी या घटने- पासून बोध घेतला पाहिजे; धर्माच्या लोकविलक्षण कल्पनांनी अंध झालेल्या धर्मवेड्यांनीं या प्रसंगापासून धडा घेतला पाहिजे. शत्रूच्या लहान अर्भकांना एका खोल खड्ड्यांत जिवंत समाधी देणाऱ्या आणि नवजवान वृद्ध स्त्रीपुरुषांस गॅस चेंबरमध्ये घालून त्यांना ठार मारणाऱ्या आजच्या काळांतील नरपशूंनी आता परत शुद्धीवर आले पाहिजे.

'अपशब्द बोलू नका असे माझ्या सेवकांना ( मुस्लिमांना ) बजावून सांगा.”


- पवित्र कुराण १७:५३


 आपल्या शत्रूचा सूड किंवा बदला घेण्याची गोष्ट तर बाजूलाच राहू द्या, पण त्यांच्याबद्दल अभद्र किंवा अपशब्द देखील बोलता कामा नये अशी पवित्र कुराणची आज्ञा आहे. ज्यांनी आपले शत्रुत्व पत्करलें आहे किंवा ज्या परधर्मियांनी आपल्यावर आग पाखडली आहे त्यांच्याबद्दल बोलतांना देखील सभ्यतेची भाषा वापरली पाहिजे. आपल्या वैऱ्याचा किंवा विरोधी लोकांचा भाषणांत उल्लेख करितांना बहुधा आपणांस अश्लिल, मधुर व असहिष्णु भाषा वापरण्याचा मोह होतो. मुस्लिम म्हणविणाऱ्याने या मोहास बळी पड नये. अपशब्द उच्चारणें किंवा अभद्र बोलणे म्हणजे अप्रत्यक्ष सूड उगविणें होय. वरील ऋचेवर भाष्य करतांना मौ. मोहम्मद अली लिहितात, “ परधर्मियांनी आमच्यावर निष्कारण जुलूम केला अशी तक्रार मुस्लिमांनीं हज़रत पैगंबरांजवळ केल्यानंतर त्यांना सहृदयी बनण्याचा व प्रतिपक्षांवर सूड न उगविण्याचा आदेश देण्यांत