पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
इस्लाम आणि संस्कृति




युरोपमधून अनेक विद्यार्थी विद्याभ्यासाकरितां येत; त्यांनी सुरू केलेल्या संशोधन कार्यांत अनेक युरोपियन मुमुक्षू भाग घेत. कला, साहित्य, शास्त्र अशा अनेकविध क्षेत्रांत मुस्लिमांनी केलेली कामगिरी कित्येक शतकांपर्यंत युरोपनें आपल्यापुढे आदर्श म्हणून ठेविली होती. स्टॅनले लेन पूल म्हणतो, "कला, शास्त्र आणि संस्कृती या बाबतींत स्पेनची राजधानी क्रोडावा ही 'सर्व जगाचे डोळे दिपवून टाकणारे वैभव' अशा यथार्थ संज्ञेने ओळखली जात होती." स्पेनमधील मुस्लिमांनी युरोपासच नव्हे तर सर्व जगास कसें ऋणी करून ठेविलें आहे याचे विवेचन आपल्या ग्रंथांत विस्ताराने केले आहे. मुस्लिमांची स्पेनमधील ७८० वर्षांची कारकीर्द म्हणजे मानवी संस्कृतीमध्ये पडलेली मोलाची भर असें सर्वत्र म्हटले जाते.

 स्पेन हस्तगत केल्यानंतर मुस्लिमांनी फ्रान्सवर चढाई करून तो देश अर्धाअधिक काबीज केला. यानंतर मात्र चार्लस मार्टेलने त्यांना पुढे सरकं दिले नाही. ही गोष्ट इ. स. ७३२ साली घडली. इकडे पूर्वेस चिनी तुर्कस्तान घेतल्यानंतर सिंधनद ओलांडून मुलतान शहर सर करण्यांत आले. त्यानंतर मुस्लिमांनी भूमध्य समुद्रांतून इटलीवर हल्ला चढविला आणि क्रीट व सिसली ही बेटें घेतली. शेवटी त्यांनी इटलीच्या काळजाला-रोमला हात घातला. रोममध्ये मुस्लिमांच्या नौबती झडू लागल्या. रोमसारखें अत्यंत महत्त्वाचे शहर पडल्यामुळे सबंध इटलीमध्ये नैराश्य पसरले व त्याचाच परिणाम म्हणजे सबंध इटली त्यांच्या हस्तगत झाला. आपल्या अतुल पराक्रमाने मुस्लिमांनी अवघ्या शंभर वर्षांत एक महान इस्लामी साम्राज्य प्रस्थापित केले. डॉ. डेपर म्हणतो, "जगानें


$ Moors in Spain, Page 151.