पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३

इस्लामचा प्रसार




हजरत उमर यांच्यानंतर हजरत उस्मान हे खलिफा बनले. 3 त्यांची एकंदर कारकीर्द १२ वषाची झाली. या अवधीत मुस्लिमांनी अनेक विजय मिळविले व आपल्या राज्याची हद्द ऑक्सस व पर्वेकडे अफगाणिस्तानपर्यंत भिडविली. हजरत अली हे नंतरचे खलिफा होत. त्यांच्या पांच वर्षांच्या कारकीर्दीत अंतर्गत झगडे निर्माण झाल्यामुळे राज्याची व्हावी तशी वाढ होऊ शकली नाही. त्यांच्यानंतर खलिफा मुआविया यांच्या कारकीर्दीत पूर्वेसर हिंदुस्तानांतील सिंधुनदीपर्यंत व पश्चिमेस टुनिसियापर्यंत मुस्लिमांनी धडक मारली. खलिफा अबुलमालिक व अलवलिदची अमदानी म्हणजे मस्लिमाच्या विजयाचा उच्चांक. दमास्कस, अलेक्झांडीया, कार्थेज आणि जेरूसलेम ही राजधानी असलेली स्त्रिश्चन शहरें मस्लिमांनी हस्तगत केली. खलिफा अलवलीदचा शूर सेनापति मसा याच्या नेतृत्वाखाली मुस्लिमसैन्याने जिब्राल्टर सर करून स्पेनवर हल्ला चढविला. स्पेनच्या बादशाहाने मुस्लिम सैन्याला थोपवून धरण्याची शिकस्त केली पण तिचा काडीमात्र उपयोग न होतां स्पेन देशावर मस्लिमांचा झेंडा फडकला. स्पेनमध्ये मुस्लिमांचे आगमन म्हणजे । संस्कृतीची प्राणप्रतिष्ठा असा इतिहासकारांनी निर्वाळा दिला आहे: इतकंच नव्हे तर " स्पेनदेशांत मुस्लिम सत्ता राहिली म्हणूनच यरोपमध्ये ज्ञानदीप प्रज्वलित झाला" असा त्यांनी कबूलीजबाब दिला आहे. साहित्य व शास्त्र यांच्या उत्कर्षाकरितां स्पेनच्या अरबांनी जे भगीरथ प्रयत्न केले त्यांचा विचार केला म्हणजे आजच्या युरोपखंडाला, अरबांनी निरनिराळे उपयुक्त शोध लावून, कायमचे ऋणी करून ठेविलें आहे असे म्हणावयास आपल्याजवळ भरपूर पुरावा आहे. मस्लिमांनी प्रथमच प्रस्थापित केलेल्या क्रोडावा विश्वविद्यालयांत
+ The History of Mahomedan Empire in Spain, P. 322.