पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्कृतीचें सारसर्वस्व

२१९


ख्रिश्चन सैनिकांवरील सूड निरपराध ख्रिश्चन जनतेवर काढण्याची कल्पना त्याला कशीशीच वाटली. आपल्या धर्मबांधवांच्या रक्ताचा बदला घेणें त्याला युक्त वाटलें नाहीं. इकडे सलाहुद्दिनच्या अंत:करणांत सद्भावनांचा कल्लोळ उडाला होता तर तिकडे ख्रिश्चन पुरुष, मुलें, स्त्रिया आदि आम जनतेचा थरकांप झाला होता. आपला मृत्यु आपल्या समोर आ वासून उभा आहे याची त्यांना जाणीव झाली. आपल्या कच्च्याबच्च्यांना उराशी धरून ख्रिश्चन माता आपले व आपल्या अर्भकांचे शेवटचे क्षण मोजीत बसल्या होत्या. त्या सर्वांना सलाहुद्दीनसमोर आणण्यांत आलें. हताश झालेले नागरिक, भीतीनें गांगरून गेलेल्या स्त्रिया आणि भेदरलेल्या मुद्रेनें त्यांना चिकटलेलीं गोजिरवाणी बालकें पाहतांच सलाहुद्दीनचें अंत:करण कळवळलें, तो पराक्रमी योद्धा दयेचा साग बनला. त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. तोच इतिहासकार लिहितो, मृदु अंत:करणाच्या त्या योद्ध्यानें सहानुभूतीचे शब्द उद्गारले. त्याच्या अंतःकरणाची कोमलता पाहून त्या स्त्रियांना धीर आला आणि त्याच्या एका शब्दाबरोबर आपली दुर्दशा नाहींशी होईल असे त्याच्यासमोर उद्गार काढले.दयाई अंतःकरणानें त्या स्त्रियांच्या विनंतीप्रमाणें त्याने सर्वांना मुक्त केलें, इतकेंच नव्हे तर त्यांना नजराणे बहाल केले. "* या वेळीं जगांतील कारुण्य | आणि भूतदया जेरूसलेमच्या पवित्र भूमीवर सलाहुद्दीनच्या स्वरू पांत प्रकट झाली होती, इस्लामचं सत्य स्वरूप अवतरलें होतें. अखिल जगास भूषणभूत होऊन राहाणारी ही अभूतपूर्व घटना इस्लामच्या इतिहासांत घडली. मानवतेचा हा हृदयंगम आविष्कार


Historian's History of the World, Vol. 8, P. 377.