पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्कृतीचें सारसर्वस्व

२१७


द्वेषाचे आणि सूडाचे विचार म्हणजे सद्भावनांचा संकोच आणि गळचेपी. मनुष्यामध्यें सूडाच्या भावना प्रवल होणें याच मनुष्यत्वाला मुकणें होय. माणसांतला 'सैतान' जागा होतो तो सूड-भावनेमुळेंच. एकाद्या व्यक्तीनें किंवा जमातीनें अनन्वित अत्या- चार केले तर बदला म्हणून तिच्या निष्पाप मुलाबाळांची कत्तल उडविणें, देवतातुल्य स्त्रियांवर अत्याचार करणें, घरादारांची होळी करून देशोधडीला लावणें आणि उरलेल्यांच्या रक्तानें सर्व जमीन भिजवून टाकणें ही काय माणुसकी! हा काय धर्म ! सूडबुद्धीनें निर्माण केलेला सैतान या गोष्टी करूं शकतो, मानव्याचा खून सहज लीलेनें पाहूं शकतो. हजरत पैगंबरांनीं द्वेष आणि सूडबुद्धीचा धिक्कार केला आहे. हजरत पैगंबरांचा, इस्लामचा आदर्श समोर ठेविल्यामुळे मुस्लिम जेत्यांनीं विजयमदानें धुंद होऊन प्रतिपक्षावर सूड न उग- वितां, त्याच्यावर दया दाखविल्याचे अनेक दाखले इस्लामच्या इतिहासांत सांपडतात.

 इस्लामच्या द्वेषाने वेडावून हजारों नव्हे लाखों मुस्लिमांना कंठ- स्नान घालणाऱ्या ख्रिश्चन धर्मीयांस त्यांचा पराभव केल्यानंतर मुस्लिमांनी कसे वागविलें याचा ख्रिश्चन इतिहासकारांनी रंगविलेला एक प्रसंग अत्यंत रोमांचकारक आहे. तो काळ धर्मयुद्धांचा ( Crusades ) होता. धर्माची विजयी पताका घेऊन युरोपमधील प्रचंड ख्रिश्चन सैन्य परधर्मियांना अक्षरश: रक्तस्नान घालीत जेरू- सलेमच्या तटाजवळ येऊन पोहोंचले. जेरूसलेमबर मुस्लिमांचा ४०० वर्षे ताबा होता. घनघोर लढाईनंत जेरूसलेमच्या तटावर ख्रिश्चनांचा झेंडा फडकला. ख्रिश्चन सैन्य धर्म- द्वेषानें धुंद झालें होतें. त्यांनीं तीन दिवस अहोरात्र शहरांतील