पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्कृतीचें सार सर्वस्व

२१५


असा ओरडा केला. इतर मुस्लिमांनींही त्याची साथ केली. हजरत पैगंबरांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनीं आपल्या अनुयायांची निर्भत्सना केली व त्या ज्यू गृहस्थास निर्दोषी म्हणून सोडून दिलें. तो काळ अत्यंत नाजूक व आणीबाणीचा होता. अगोदरच हजरत पैगंबरांचे अनुयायी कमी आणि तशांत आपल्या अनुयायांची निर्भत्सना ज्यू गृहस्थास सोडणें म्हणजे आहे त्या अनुयायांचें अनुयायित्व गमावण्यासारखें होतें. पण हजरत पैगंबरां- नीं या गोष्टीचा विचार न करतां न्याय्य वृत्तीचा अवलंब केला. वरील ऋचा सदर प्रसंगास अनुलक्षून आहे. यावर भाष्य करतांना मौलाना मोहम्मद अली लिहितात, " गुन्हेगार इस्लामचा अनुयायी असला आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ते मुस्लिमेतर किंवा मुस्लिमांचे कट्टे वैरी असले तरी त्याचा विचार न करतां गुन्हेगारीस सजा मिळालीच पाहिजे हें विशाल तत्त्व वरील ऋचेवरून प्रस्थापित होते. प्रत्येक मुकदमा त्याच्या गुणधर्मानुसार निकालांत काढला पाहिजे आणि न्यायाचा समतोलपणा मुस्लिम व मुस्लिमेतर, मित्र व शत्रु यांमध्ये सारखा राखला पाहिजे."*

 एकादे दुष्कृत्य करावयाचें आणि त्याचा कार्यकारणभाव दुसऱ्या चांगल्या गोष्टींशीं लावन पळवाट काढण्याचा प्रघातही त्याज्य मानण्यांत आला आहे. लूटमार किंवा डाकूगिरी करावयाची आणि तो पैसा एकाद्या चांगल्या कार्याकरितां खर्च करावयाचा है इस्लामला शिष्टसंमत वाटत नाहीं. लूटमार किंवा डाकूगिरी म्हणजे उघड पाप, अन्याय व जुलूम, पाप करून, न्यायाचा खून पाडून, जलूम जबरदस्ती करून लुटलेला पैसा इमानदारीचा आहे, निढळाच्या


The Holy Quran by Mohamad Ali, Page 231.