पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१४
इस्लाम आणि संस्कृति


तिटकारा करा; पण अशा (नुसता तिटकारा करणाऱ्या) मनुष्या- मध्यें धर्माची भावना कमकुवत आहे असें समजावें. "

- हजरत मुहम्मद पैगंबर


 आपल्या सर्व सामर्थ्यानिशीं दुष्कृत्यास पायबंद घालणारासच इस्लामचा सच्चा अनुयायी म्हणतां येईल. अशा वेळीं दुष्कृत्य कर णारा कोण आहे याचा विचार करता कामा नये. कित्येक लोक खोट्या अभिमानास बळी पडून, एकादें दुष्कृत्य आपल्या जमातीच्या लोकांनी केल्यास तें लपवण्याचा प्रयत्न करतात; याही पुढे जाऊन दुष्कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांची बाजू घेऊन भांडावयास उठतात. ही मनोवृत्ति निंद्य आहे असें इस्लाम समजतो.

गुन्हेगार लोकांची बाजू घेऊन भांडूं नका.”



 दुष्कृत्य करणारा आपल्या जमातीचा असला तरी त्याची बाजू, कदापिही घेतां कामा नये. अशा माणसाचा पाठपुरावा करणें म्हणजे त्याला व इतरांना अशीं दुष्कृत्ये करण्यास प्रोत्साहन देण्या- सारखें आहे. प्रत्येक जमात, प्रत्येक गट जर गुन्हेगारांना संरक्षण देऊ लागला व त्याच्याकरितां भांडूं लागला तर जगामध्ये न्यायाची व सत्कृत्याची व्याख्या करणंच कठीण होऊन बसेल. या दृष्टीनें 'हजरत पैगंबरांच्या आयुष्यामधील एक प्रसंग उद्बोधक आहे. अरबस्तानांत इस्लामचा नुकताच प्रसार होऊं लागला होता. इस्लामचे अनुयायी व ज्यू यांच्यामध्ये विलक्षण वैमनस्य नांदत होतें. अशा परिस्थितींत एका मुस्लिमानें एक चिलखत चोरलें आणि तें एका ज्यू, गृहस्थाच्या घरीं गुपचुपपणे ठेवून त्या ज्यू गृहस्थानें चोरी केली