पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१२
इस्लाम आणि संस्कृति


जिची झेंप मानव्यापर्यंत पोहोंचते तिलाच संस्कृति हैं नांव शोभून दिसेल. या विचारसरणीचा पुरस्कार इस्लामधर्म प्रणेते हजरत मुहम्मद पैगंबर यांनीं केला आहे. एक विद्वान् ग्रंथकार म्हणतो, " थोर मनुष्य हा मुख्यत्त्वेकरून राष्ट्राभिमानी असतोच. प्रथम राष्ट्र' आणि नंतर परमेश्वर व मानवता असें तो मानतो. हजरत पैगंबरांच्या बाबतीत याच्या उलट परिस्थिति होती. जन्मानें अरब पण त्यांनी सर्वापेक्षां परमेश्वर आणि मानवता यांनाच अग्रस्थान दिल्यामुळेच ते मानवतावादी बनले. यामुळेच ते त्या काळाच्या किती तरी पुढे होते. " +
 इस्लाम हा आजच्या काळांतही ताजातवाना व आकर्षक वाटतो, याचें कारणही त्यानें प्रस्थापित केलेला मानवतावाद हेंच होय, या उदारमतवादामुळेच स्वतःचे हित पाहणाऱ्या व प्रसंगी दुसऱ्यास ठोकरणाऱ्या अनेक राष्ट्रीय घटकांना आत्मसात करणारा आध्यात्मिक उत्साह इस्लाममध्यें संचारू शकला असे आपणांस म्हणावें लागेल. इस्लामच्या कडव्या अद्वैतवादामुळे निरनिराळीं राष्ट्रें व जमाती यां- मध्ये उभ्या असणाऱ्या अजस्र भिंती कोसळून पडल्या; निरनिराळ्या पंथांचा दुरभिमान गळून पडला; विस्कळित झालेली जनता एकत्र येऊ शकली, उच्च-नीच, काळा-गोरा व स्त्री-पुरुष हे कप्पे नष् झील परमेश्वर एक व सर्व मानव त्याची लेकरे ही विशाल दृष्टि आली. परमेश्वर एक आहे ही इस्लामची घोषणा म्हणजे मानवता- वादाचा भरभक्कम पाया होय. परमेश्वराने निर्माण केलेल्या यच्चयावत

प्राणिमात्रांवर प्रेम करणें म्हणजेच परमेश्वरावर प्रेम करणें, त्याला


+ Islam — Her Moral and Spiritual Value by : Leonard,


Page 110.