पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्कृतीचें सारसर्वस्व

२११


कोणत्याही तत्त्वज्ञानाचें किंवा वैचारिक सांप्रदायाचें तो सदैव स्वागतच करतो. मानव्याचा पुरस्कार करणारे किंवा महात्माजींच्या * सर्वोदया 'सारखे मानवी जीवन उन्नत करणारें कोणतेंही तत्त्वज्ञान असो त्याचें इस्लाम केव्हांही स्वागतच करील. इस्लाम हा हटवादा- पासून सर्वस्वीं अलिप्त असल्यामुळे कोणत्याही संस्कृतीशीं त्याचा संघर्ष झालेला आढळून येत नाहीं. उलट अन्य संस्कृतीशीं झगडा करता तिच्याशीं एकत्रित नांदण्याचा दिलदारपणा त्यानें दाखविला आहे. उदाहरण म्हणून सर जॉन मार्शल नांवाच्या इतिहासकारानें काढलेले उद्गार लक्षांत ठेवण्यासारखे आहेत. तो म्हणतो, “मुस्लिम आणि हिंदु संस्कृतीसारख्या अलग पण महान् व जोरांत विकास पावलेल्या दोन संस्कृति एकमेकांशी मिसळत व एकत्रित होत असल्याचे दृश्य मानव जातीच्या इतिहासांत क्वचितच सांपडेल. "* | मानवांचें जीवन सुखी करणें हें संस्कृतीचें प्रधान कार्य असल्यामुळे मानव्याचा पुरस्कार करणाऱ्या त्या संस्कृतीस इस्लामकडून विरोध होणें कदापिही शक्य नाहीं.

 मानव्य हा संस्कृतीचा निकष आहे असें इस्लाम मानतो. मान- व्याला डावलणारे कोणतेंही तत्त्वज्ञान, आचारविचार, जातीय किंवा / राष्ट्रीय भावना यांना खऱ्या अर्थानें संस्कृति असें कधींही म्हणतां येणार नाहीं. जातीयता म्हटली कीं त्या ठिकाणीं दुसऱ्या जमातीचा द्वेष न कळत आलाच. संस्कृतीच्या गोंडस नांवाखाली जातीयतेचा पुरस्कार करणें, स्वजातीयांना दुसऱ्या जमातीविरुद्ध भडकावणें, त्यांच्यामध्ये द्वेष व तिरस्कार निर्माण करणे याला संस्कृति म्हणाव याचें कां संस्कृतीचें विडंबन ! जमात किवा राष्ट्र यांना ओलांडून


The Cambridge History of India, Vol. III.