पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२

इस्लाम आणि संस्कृति



असे ज्यांना वाटते, त्यांना काय म्हणावें तेच कळत नाही. कारण 'अल्लाहो अकबर'च्या गर्जनेने कुराण किंवा तलवार यांपैकी एकाची निवड करावयास इस्लामनें-मुहम्मदाने सांगितले असें जे मानतात त्यांना हे माहित तरी नसावे किंवा ते तिकडे दुर्लक्ष तरी करीत असावेत की, मुहम्मदाच्या पाठोपाठ त्यांच्या गादीवर आलेल्यांना ऐहिक विजयावरच भर दिला. ते सर्व औदार्य, पावित्र्य आणि भूतदया इत्यादि गुणांमध्ये मानवी समाजावर तुटून पडणाऱ्या अॅलरिक, चैगीजखान, वगैरे रानटी लोकांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ होते. त्यांच्या भक्तीभोवती रूढीचे अवलय असेल परंतु ते दांभिक नव्हते. व्यवहारज्ञान व औदार्य यांनी त्यांच्या धर्मवेडाला हळुवारपणा आणला होता. ते महत्त्वाकांक्षी होते पण पूर्णपणे निःस्वार्थी होते. देवभक्तीच्या नावाखाली ते आपली धनभक्ति झांकीत नव्हते. धर्मरक्षक अबुबकर यांच्याइतकी भक्तिवान् , उदात्त, कार्यनिष्ठ व नम्र व्यक्ति इतिहासांत शोधं जातां सांपडणार नाही. त्याने सेनेला दिलला संस्मरणीय संदेश पहा : 'न्यायी बना, अन्यायाने वागणारे कधीच उन्नत होत नसतात. धैर्यशाली बना, मरण पत्करा, पण शरण जाऊ नका. दया दाखवा; वैद्ध, स्त्रिया आणि मुले यांना मारूं नका; फळझाडे, धान्य आणि पशू यांचा नाश करूं नका, शत्रुला देखील दिलेले वचन पाळा.' या आज्ञा मनापासून सोडल्या व पाळल्या जात म्हणून तर अप्रतिहतपणे विजय मिळत असत. अरबस्वाराच सर्वत्र 'स्वातंत्र्यदाते' म्हणून स्वागत होत असे. मुहम्मदाची क्रांतिकारक शिकवण निष्ठेनें तंतोतंत पाळणारे आणि सुज्ञ खलिपाच्या आदेशाप्रमाणे आचरण करणारे, लोकांच्या सहानुभूतीस कां बर पात्र होणार नाहीत ?"


+ Historical Roll of Islam, Page 15.