पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ८ वें



संस्कृतीचें सारसर्वस्व


 "आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडांत अरब केवढ्या जलद रीतीने पसरले, त्यांनीं थोर संस्कृति व सुधारणा कशी घड- वून आणली याची कथा म्हणजे इतिहासामधील एक चमत्कार होय. "*

-- पंडित जवाहरलाल नेहरू


 अगदी थोड्या काळांत इस्लामनें घडवून आणलेली वैचारिक क्रांति; प्रस्थापित केलेली शाश्वत नैतिक मूल्ये, आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रांत निर्माण केलेला क्रांतिकारक दृष्टिकोण, तत्त्वज्ञ व भौतिक शास्त्रामध्ये उघडलेली आघाडी या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर इस्लामनें मानवी संस्कृतींत केवढी मोलाची भर घातली आहे याची आपणांस कल्पना येईल.

 संस्कृति म्हणजे धार्मिक जडवाद नव्हे किंवा भोंदू धर्मगुरूंनीं तयार केलेलें रूढींचें कुंपण नव्हे. संस्कृतीचा अर्थ विशाल आहे. जीवनाचे सौंदर्य व वैभव वाढविणारे नीतिनियम, आचारविचार, तत्त्वज्ञान, कला, कायदे व चालीरीति, राजकारण या सर्वांचा समावेश संस्कृतीमध्यें होऊं शकतो. संग्राहकता व उदात्तता हीं तिचीं वैशिष्ट्यें आहेत. संस्कृतीमध्यें अगतिकता किंवा पुराणमत-


 Glimpses of World History.

२०९


इ.सं. १४