पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०८
इस्लाम आणि संस्कृति


न जाणारा असा वज्रलेपासारखा ठसा मानव इतिहासाच्या पानावर उमटविला.”* आज युरोप सुधारणेच्या आघाडीवर आहे पण त्यानें देखील मुस्लिमांचें ऋण कबूल केलें आहे. स्पेनमध्ये सातशे वर्षे आपल्या वैभवाने तळपणारी मुस्लिम राजवट सबंध युरोप खंडास भूषणभूत होऊन राहिली होती. स्पेनमध्यें मुस्लिम अधिसत्ता नसती तर युरोपचा रानटीपणा आणखी कित्येक शतकें तसाच कायम राहिला असता असा निर्वाळा निरनिराळ्या इतिहासकारांनी दिला आहे. आशिया आणि युरोपमधील मुस्लिमांची राजवट म्हणजे कला व विद्येचें पुनरुत्थान, विज्ञान व तत्त्वज्ञान यांचा उत्कर्ष, त तेवत असलेला संस्कृतीचा नंदादीप मुस्लिमांचें हें ऋण कबूल करतांना इतिहासकार लिहितात, “हल्लीच्या सुधारणांच्या प्रत्येक शाखेमध्यें अरब मुस्लिमांच्या कर्तृत्वाची छाप पडलेली दिसून येते. नवव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत साहित्याची प्रचंड निर्मिति झाली, उत्पादनाची वाढ झाली. त्या काळीं मानवी बुद्धिमत्तेनें केवढे श्रेष्ठ कार्य केलें आहे याची दखल नव्या कल्पना व शोध यांनी दिली. सबंध युरोपवर त्यांची पडलेली छाप पाहिली. म्हणजे अरब मुस्लिमांनीं सर्व गोष्टींमध्यें आम्हांस मार्गदर्शन केलें आहे हें मत ग्राह्य व योग्य वाटतें."


* Islam—Her Moral and Spiritual Value, by Leonard,


P. 152.


+ Historian's History of the World, Vol. 8, P. 275.