पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञानं

२०७


 चांचेगिरी करणाऱ्यांपासून व्यापारी जहाजांना सरंक्षण मिळावें म्हणून त्यांच्याबरोबर आरमार ठेवण्याची प्रथा मुस्लिमांनी चालू केली. याच आरमाराचा पुढें लढाईंत उपयोग करण्यांत येऊ लागला. एके काळी तर तुर्कस्थानचें आरमार युरोपमध्यें अत्यंत बलाढ्य समजण्यांत येई. इकडे हिंदुस्थानांत अकबर बादशहानें आरमार बांधण्याचा थोडाफार प्रयत्न केला. टिपु सुलतानचे आरमार मंगलोर व कालीकत येथे सदैव सज्ज असे. म्हैसूरच्या इतिहासांत सर कर्नल विल्क्स यानें म्हैसूर राज्याच्या एकंदर उत्पन्नाचा है भाग टिपु सुलतान आपल्या आरमारावर खर्च करीत असल्याचे करून ठेविलें आहे.

 तत्त्वज्ञान, विज्ञान, साहित्य, व्यापार इत्यादि क्षेत्रांत असामान्य कार्य करून मुस्लिमांनी मानवी संकृति किती समृद्ध केली आहे याची आपणांस थोडीफार कल्पना येईल. " मध्ययुगीन काळांतील संकृतीचे एकमेव प्रतिनिधी" अशा शब्दांत इतिहासकारांनी मुस्लिमांना गौरविलें आहे; इतकेंच नव्हे तर जगांतील तेथे माणुसकी प्रस्थापित करण्याचें त्यांनी महान् कार्य केलें आहे असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. लिओनार्ड म्हणतो, " इस्लामनें कोट्यवधि लोकांस हीना- वस्थेतून संस्कृतीच्या उच्च वातावरणांत नेऊन सोडलें आहे. त्यानें आफ्रिका आणि आशिया खंडांत बलिदानाचा पुरस्कार करणाऱ्या जुन्या धर्मपंथांची शुद्धी केली, चांगले व मानवतेस पोषक होणारे कायदे केले, व्यापार व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिलें आणि स्थिर राहणारी राज्यपद्धति प्रस्थापित केली... इस्लामनें कधीही पुसला


+ Historian's History of the World, Vol. 8, P. 271.