पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०६
इस्लाम आणि संस्कृति


समुद्रामध्ये दिशा कळावी म्हणून होकायंत्र शोधून काढण्याचे श्रेय त्यांनीच मिळविले आहे. मोठ्या प्रमाणावर माल नेण्याकरितां मोठमोठी जहाजें मुस्लिमांनी बांधली. दर्यावर्दीपणांत त्यांनी इतकें प्रावीण्य संपादन केले की नवीन नवीन वेटें त्यांनी शोधन काढली. एक ग्रंथकार म्हणतो, " दहाव्या शतकांतच मुस्लिमांची जहाजे कँटनला पोहोंचली. तेथून त्या जहाजांनी ईशान्येकडील कोरिया, जपान, फिलिपाईन्स बेटांकडे आपला मोर्चा वळविला, दक्षिणेकडे सुमात्रा, जावा, मलका इत्यादि बेटांचा शोध मुस्लिमांनींच लाविला. . . . मलबार व सिलोनशी मुस्लिमांनी जहाजांची वाहतूक ठेविली होती. मलबार किनाऱ्यावर लहान लहान मस्लिम वसाहती स्थापन करण्यांत आल्या. हिंदुस्थानच्या भूमीवर पदार्पण करणाऱ्या वास्कोड-गामाचा वाटाड्या अहंमद नांवाचा मस्लिम नावाडी होता. अहंमदजवळ समुद्राचा नकाशा व होकायंत्रासारखी उपयुक्त अशा उपकरणे होती. त्याने हिंदी महासागर, तांबडा समंद्र, पशियाच आखात, चिनी समुद्र यांवर प्रवास कसा करावा यांचा दोवदी इतिहास लिहिला आहे.....नाईल नदीमध्ये वहातक करणारा सव्वीस हजार लहानमोठी गलबतें होतीं."*

 जहाजांमधून माल उतरविण्याकरितां मुस्लिमांनी ठिकठिकाणी समद्रकिनारी धक्के बांधले. " बंदर किंवा धक्क्याच्या ठिकाणी त्यांनी आयात व निर्यात करणाऱ्या कचेया बांधल्या आणि जकातनाकी उघडली. व्यापारी पत्रके व मासिकें काढली. व्यापारशास्त्रावर अबुल कासीम नांवाच्या तज्ज्ञाने अनेक ग्रंथ प्रसिद्ध केल आहेत."


Outline of Islamic Culture, Vol. I, P. 205-6.


+Europe's Debt to Islam, P. 36.