पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

२०५

 तर कोडोवाचे रस्ते फरसबंदी होते. युरोपांतील लोकांना सही करतां येत नव्हती तर क्रोडोवांतील मुले शाळेत गर्दी करीत. "+
 आशिया, आफ्रिका व युरोप खंडामध्यें सर्वत्र मुस्लिमांनीं व्यापाराचें जाळे पसरलें होतें. या प्रचंड पसायाबद्दल एक ग्रंथकार म्हणतो, " बारा, तेरा आणि चौदाव्या शतकांत प्रचंड प्रमाणावर व्यापार सुरू होता. अल्मेरिया, मलगा, वार्सिलोना आणि कडीझ ही मोठ्या प्रमाणावर मालाची निर्यात करणारी बंदरें होतीं. स्पेन, बार्बरी, ईजिप्त, अबिसिनीया, हिंदुस्थान, चीन, कास्पियन समुद्रा- वरील सर्व वसाहती, मक्का, मदीना, कुफा, बसरा, दमास्कस व बगदाद इत्यादि ठिकाणीं व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यात आले. आफ्रिका, हिंदुस्थान व मलाया द्वीपकल्पावर वसाहती स्थापन करण्यांत आल्या. स्पेन, सिसली, इटली व फ्रान्समध्ये नवीन व्यापारी केंद्रे प्रस्थापण्यांत आली. उत्तर आफ्रिका, मध्य आशिया, उत्तर हिंदुस्थान व पर्शियन प्रदेशांमधून व्यापाराच्या सोयीचे मार्ग उघडण्यांत आले." *

 मुस्लिमांच्या दुर्दम्य व्यापारी महत्त्वाकांक्षेला खुष्कीचे मार्ग । अपुरे पडं लागल्यामुळे त्यांनी समुद्रामधून व्यापार करण्याचा विडा उचलला. समुद्रपर्यटण निषिद्ध आहे असा दंडक इस्लाममध्ये नसल्या- मुळे त्यांच्या या नव्या कल्पनेचा संकोच कधींच झाला नाहीं. त्यांनीं उदकस्थितिशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे समुद्रावर तरंगणारीं गलबते बनविण्यांत त्यांना यश आले. धाडसी स्वभाव व कल्पकता यांमुळे समुद्रमार्गे गलबतांमधून निर्वेधपणें व्यापार सुरू झाला.


†The Story of Medicine, P. 164.


*Europe's Debt to Islam, P. 35.