पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०४
इस्लाम आणि संस्कृति


येत असे. ईशान्येस सैबिरिया व चिनी तुर्कस्थानति व्यापारी काफिले घुसले. " +

 व्यापारामुळे मदिना, कुफा, बसरा, कायरो, दमास्कस, मोसल, बगदाद, क्रोडोवा, सेव्हेली, ताउदो हीं प्रमुख मुस्लिम शहरें विलक्षण भरभराटीस आली. तोच ग्रंथकार म्हणतो, " मुस्लिमांच्या कारकिर्दीत १० लाखांपासून ४० लाख नागरिकांची वस्ती असलेली अनेक शहरें होती. फक्त ईजिप्तमध्येच छत्तीस हजार मशिदी होत्या. बगदाद शहरांत साठ हजार स्नानगृहें होतीं. वर लिहिलेल्यांपैकी अर्धी संख्या खरी आहे असें जरी मानले तरी त्या शहरांच्या उत्कर्षाची आपणांस कल्पना येते. फ्रेंच ग्रंथकारांच्या आधारें ताल्दो शहराची २० लाख व क्रोडोबाची १० लाख लोक-संख्या होती. क्रोडोवाच्या मशिदर्दीत आठ हजार दिव्यांची रोषणाई केली जात असे व त्याकरितां वीस हजार पौंड तेल वापरण्यांत येत असे. " *

 व्हिक्टर रॉबिनसन् नांवाच्या आणखी एका ग्रंथकारानें ज्या वेळीं मुस्लिम शहरें संस्कृतीचीं केंद्रे बनलीं होती, त्या वेळी युरोप केवढा मागासलेला होता याचें वर्णन केले आहे. तो म्हणतो, “सूर्यास्ता- नंतर युरोपमध्ये सर्वत्र अंध:कार तर क्रोडोवामध्यें सार्वजनिक दिव्यांचा झगझगाट असे; युरोप अस्वच्छ होता तर क्रोडोवामध्ये

एक हजार सार्वजनिक स्नानगृहें होतीं; युरोपमध्ये सर्वत्र चिखल


+ Outlines of Islamic Culture, Vol. I, P. 199-202.


Outlines of Islamic Culture, Vol. I, Pages 201-203.