पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

२०३


चिकित्सक दृष्टीनें विचार करण्याची वृत्ति अंगीं बाणते. व्यापार आध्यात्मिक क्रांतीचें एक महान साधन आहे असें मानतो.

 मुस्लिम सत्ता ज्या ठिकाणी प्रस्थापित झाली त्या ठिकाणीं व्यापाराचा उत्कर्ष होत गेला असें आपणांस दिसून येईल. मुस्लिम राजवटींत व्यापाराकरितां अनेक सवलती देण्यांत आल्या, इतकेंच “व्यापारी तर वाहतुकीकरितां खास रस्ते तयार करण्यांत आले; वालुकामय प्रदेशांत, रस्त्यालगत ठिकठिकाणी विहिरी व तलाव खोदण्यांत आले; व्यापाऱ्यांना प्रवाश्यांना उतरण्याकरितां सराई किंवा धर्मशाळा बांधण्यात आल्या. निर्जन प्रदेशांतून जातांना व्यापारी काफिल्यावर हल्ला होऊं नये म्हणून त्यांस सरकारी संरक्षण देण्यांत येत असे. एक ग्रंथकार म्हणतो, ' काफिल्यांना विश्रांतीकरितां विश्रांतिस्थानें बांधण्यांत आलीं, रस्ते तयार करण्यांत आले, टपालखात्याची सोय करण्यांत आली, आणि व्यापाऱ्यांना सर्व प्रकारच्या सवलती देण्यांत आल्या. व्यापारामुळे स्पेनपासून तो थेट चीनपर्यंत अरबी ही सर्वसामान्य भाषा झाली.... रेई, इस्पहान, हिरान, निशापूर हीं शहरें चीन व हिंदुस्थानच्या मार्गावर वसविली गेलीं. रशियांशीं व्यापार सुरू करण्यांत आला. युरोपियन व ज्यू व्यापाऱ्यांमार्फत इंग्लंड, नार्वे व स्वीडन देशांत त्यांचा व्यापार चालू होता हे त्या वेळीं प्रचलित असलेल्या व हल्लीं त्या देशांत सांपडलेल्या इस्लामी नाण्यांवरून सिद्ध होतें. खोरासान खीमधून रशियामधील होल्गा व डोन नद्यांच्या मुखापर्यंत मुस्लिम व्यापाऱ्यांनीं मजल मारली. फर, मेण व मध इत्यादि रशियन वस्तूंच्या मोबदल्यात रेशीम, कापूस व कापड पुरविण्यांत