पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०२
इस्लाम आणि संस्कृति


घरणारा कोणीही नव्हता. कलमें कर्शी बांधावीं, विविध प्रकारची फुलें व फळे यांची निपज कशी करावयाची या बागाईत शास्त्रामध्ये तर त्यांची बरोबरी करणारे दुसरे कोणी नव्हते. पूर्वेकडील अनेक वृक्ष व वनस्पती यांची लागवड त्यांनी पाश्चात्य देशांत केली आणि शेतकीवर शास्त्रोक्त असे प्रबंध लिहिले. "+

व्यापार व आरमार


 व्यापार हें मुस्लिम संस्कृतीचें एक महत्त्वाचे अंग आहे. व्यापार म्हणजे नुसते पैसे मिळविण्याचेच साधन नसून आंतरराष्ट्रीय संबंध अधिक घनिष्ट करण्याचा तो एक उत्कृष्ट मार्ग आहे असे मुस्लिम समजतात. व्यापारामुळे जागतिक कुटुंबांतील एक घटक या नात्यानें राहण्याची मनोभूमिका तयार होते असा त्यांचा विश्वास आहे. याशिवाय मुस्लिमांच्या पवित्र धर्मग्रंथांत - पवित्र कुराणमध्ये-- व्यापारास प्रोत्साहन देणें व त्याचा अवलंब करणें ही अत्यावश्यक गोष्ट आहे असें स्पष्टपणें नमूद केल्यामुळे व्यापार करणें ही एक धर्माज्ञाच आहे असे मुस्लिम मानतात. पवित्र कुराणाखेरीज कोणत्याही धर्मग्रंथांत व्यापारास धर्माज्ञेचें स्वरूप दिल्याचें आढळून येत नाही.
 व्यापारामुळे मनुष्याचा आध्यात्मिक विकास होऊं शकतो. व्यापाराकरितां अनेक ठिकाणी प्रवास केल्यामुळे मनुष्यस्वभावाचे निरनिराळे प्रकार, चालीरीति व प्रघात यांचा परिचय होऊन तार- तम्य दृष्टी प्राप्त होते. ‘अवलोकन व औत्सुक्य' यांमुळे जुन्या-

पुराण्या कल्पना व रूढी यांचें वैफल्य चटकन नजरेंत भरतें.


+ Outline of History, Page 434-35.