पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

२०१


क्रोडावा शहरांतच रेशमाचे सोळा हजार माग होते. सेव्हीली. शहरांत एक लक्ष तीस हजार विणकाम करणारे लोक होते. " *

 मुस्लिमांनीं कागदाची केलेली निर्मिती तर अत्यंत महत्त्वाची आहे. एक ग्रंथकार म्हणतो, “ अरबांनी केलेल्या कागदाच्या उत्पादनामुळे " ↓ कातडें जगाच्या संस्कृतीमध्ये मोलाची भर पडली आहे. कमावण्याची कला अरबांनींच सर्व जगाला शिकविली आहे. स्पेनमध्ये कातड्याचे मोठे कारखाने अस्तित्त्वांत होते. रसायनशास्त्र मुस्लिमांना अवगत असल्यामुळे कातडें रंगविण्यांत ते तरबेज होते. हल्लीं जें उत्कृष्ट कातडें समजलें जातें त्यास मोरोक्को व क्रोडावा या नांवांनी अद्याप संबोधिलें जातें. शेतकी व उद्योगधंद्यामध्यें मुस्लिमांनी जें मानाचें स्थान मिळविलें होतें त्याबद्दल विख्यात शास्त्रज्ञ एच्. जी. वेल्स यांनी काढलेले उद्गार अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात, 'कलाकुसरीची विविधता, सौंदर्य आणि पूर्णत्व या बाबतीत ते || जगाच्या आघाडीवर होते. सोनें, चांदी, तांबें, ब्राँझ, लोखंड आणि पोलाद इत्यादि सर्व धातूंचा उपयोग ते करीत. विणकर कापडां त्यांच्याइतकी कुणीही प्रगती केली नाहीं. अत्युत्कृष्ट अशी कांचं व मातीची भांडी ते तयार करीत. रंगकामाचें गुपित त्यांना माहित होतें; कागदाचें उत्पादन ते करीत. कातडें कमवण्याच्या त्यांच्या पुष्कळ पद्धती होत्या आणि त्यांचें हें काम संबंध युरोपमध्ये ख्यात होतें. ते अर्क व शरबतें तयार करीत; उसापासून साखर काढीत; शास्त्रोक्त रीतीनें ते शेतकी करीत; पाटबंधारे यांच्या चांगल्या पद्धती त्यांनी आत्मसात केल्या होत्या. बागाईतामध्यें तर त्यांचा हात


*Outline of Islamic Culture, Vol. I, P. 203.


+ Europe's Debt to Islam, Page 32.