पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९९

इस्लाम आणि विज्ञान


सिद्धांत त्यांनी खोडून काढला व असे प्रतिपादले की पदार्थापासून येणारा किरण डोळ्यांत शिरतो.. त्यांना प्रकाशाचे परावर्तन व वक्रीभुवन माहित होते. अल-हसनने वातावरणांतून येणाऱ्या प्रकाशाच्या किरणांचा मार्ग वक्ररेषांचा बनलेला असतो हा मोठा शोध लाविला आणि त्यामुळे सूर्य व चंद्र उदयापूर्वी व अस्तानंतर थोडा वेळ दिसतात हे सिद्ध केले."*
शेती व उद्योगधंदे
 इस्लामच्या दृष्टीने शेती, उद्योगधंदे व व्यापार यांना मोठे स्थान आहे. आधिभौतिक शास्त्रांचा अभ्यास करण्यांत मुस्लिमांनी जी परता दाखविली तशीच ती मानवी जीवनास अत्यंत आवश्यक सणान्या कृषिशास्त्रांतही दाखविली आहे. मस्लिमांनी युरोपमध्ये पण केले त्या वेळी यरोपियन लोक कृषिशास्त्रांत बरेच मागासलेले 1. शताची मशागत. सुपीकता आणि नवीन लागवड या बाबतीत व लोक यरोपचे मार्गदर्शक बनले. तांदळ वगैरेसारखीं अन्नधान्ये पळा युरोपला माहित नव्हती. एक संशोधक म्हणतो, "तांदूळ, स, कापूस, केशर वगैरेची ओळख स्पॅनिश लोकांना मस्लिमांनीच म करून दिली. "यरोपमध्ये कित्येक ठिकाणी रुक्ष व उजाड ना होत्या, त्या अरबांनी सपीक करून टाकल्या. स्पेन तर देश समजला जात होता: पण अरब लोकांचे त्यावर अधिपत्य आल्यानंतर थोड्याच काळात काळांत तो देश समृद्ध झाला.

 शेतीच्या उत्कर्षावर राष्टांचें उत्कर्ष अवलंबून असतं ही खूणगांठ


* History of the Conflict between Religion & Science,


P. 116-17.


+ Backmann's History of Inventions, Vol. I, 4.