पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९८
इस्लाम आणि संस्कृति


सेव्हेलीचे अमीर यांच्यामधील लढाईंत कितीतरी मार्गानें दारूचा उपयोग करण्यांत आला. इ. स. १२०५ मध्ये महादीयाच्या वेढ्या-मध्यें अमीर याकूबनें तोफखान्यांचा उपयोग केला. इ. स. १३४२ सालीं अलजे किस्सचा वेढा पडला होता, त्या वेंळीं शरु-गोळ्याचा केलेला उपयोग लॉर्ड डबीं व सत्सबरी या दोघां इंग्रज उमरावांनी समक्ष पाहिला. या दारुगोळ्याचा परिणाम या दोघांनीं पाहिल्यानंतर तें गुपित त्यांनी आपल्या देशास नेलें. पुढे चार चर्षांनीं क्रेसीच्या समरभूमीवर त्याचा उपयोग त्यांनी करून पाहिला.याखेरीज कानठळ्या बसविणारी व आग ओतणारीं लष्करी आयुर्वे मुस्लिमांनी आपल्या कारखान्यांत तयार केली.त्यांनींच लाविला आहे. " + " मुस्लिमांनी शोध हॉव्हिझरचा लावलेल्या कागद,बंदुकीची दारू व होकायंत्राच्या शोधामुळे आधुनिक युरोपचें स्वरूप पार पालटून गेलें आहे. " * असे यथार्थ उद्गार एका इतिहास-काराने काढले आहेत.

 "उदकस्थिति शास्त्र (Hydrostatics) व प्रकाश शास्त्र (Optics) या दोन शास्त्रांत मुस्लिमांनीं लावलेले शोध शिरोधार्य मानले जातात.या शास्त्रांसंबंधी प्रचलित असणारे सिद्धांत मुस्लिम शास्त्रज्ञांनी संपूर्णपणें खोडून काढले आहेत. या संबंधी डॉ. ड्रेपर लिहितो,उदकस्थिति शास्त्रांतील द्रव पदार्थाच्या विशिष्ट गुरुत्वाचीं कोष्टकें त्यांनींच प्रथम बनविली आणि पाण्यांत बुडणान्या व तरंग-णाऱ्या पदार्थाविषय चर्चात्मक प्रबंध लिहिले. 'प्रकाशाचे किरण डोळ्यांपासून निघून दृश्य पदार्थोवर पडतात ' हा ग्रीक शास्त्रज्ञांचा


+ Europe's Debt to Islam, Page 38.


* History of Mohamedan Empire in Spain, P. 320.