पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

१९७


खास वैशिष्ट्य म्हणजे “ती ऋतुपरत्वें उष्ण किंवा थंड ठेवण्याची व्ययस्था करण्यांत आली होती."*
 त्याचप्रमाणें आंधळे, महारोगी व वेडे यांच्याकरितां स्वतंत्र रुग्णालयें प्रस्थापित करण्यांत खलिफा अल वलीद याने पुढाकार घेतला होता. सर्व रुग्णांना मोफत उपचार व असे. वेड्यांच्या इस्पितळांत त्यांच्या खोल्या विशेष अन्न देण्यांत येत शृंगारले रलेल्या असत.
 आतांपर्यंत केलेल्या विवेचनावरून वैद्यकशास्त्रांत मुस्लिमांनी केवढें असामान्य कार्य करून ठेविलें आहे याची सर्वसाधारण कल्पना वाचकांना येईल.
संकीर्ण शोध
 मुस्लिमांनी विज्ञानाच्या निरनिराळ्या शाखेत केवढे शोध लाविले आहेत याचें विवेचन आतांपर्यंत थोडेंफार केले आहे.याखेरीज त्यांनीं लाविलेल्या कांहीं संकीर्ण शोधांचा थोडक्यांत विचार करावयाचा आहे. कागद किंवा होकायंत्राप्रमाणे बंदुकीच्या दारूचे उत्पादक तेच आहेत. एक ग्रंथकार म्हणतो, "युरोपियन लोकांच्या स्वप्नांत देखील जी गोष्ट आली नाहीं त्या गोष्टीचें'

(बंदुकीची दारु ) ज्ञान अरबांना सुपरिचित होतें. त्यांच्या या नव्या शोधामुळे जगाच्या लष्करी परिस्थितीत केवढी तरी क्रांती झाली.लढाईच्या वेळी ते दारुगोळा तयार करीत व तो युद्धांत वापरीत.इ.स. ६९० सालीं मक्केच्या वेढ्यांत एक प्रकारचा स्फोटक गोळा त्यांनी वापरला होता. अकराव्या शतकांत टयनिसचे राजे व


*The Arab Civilization, P. 118.