पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९६
इस्लाम आणि संस्कृति


पाया घातला. रुग्णालये (Hospitals ) काढण्याची प्रथा त्यांनीच सुरू केली आहे. गोरगरीब, अनाथ अशा रोग्यांची व्यवस्था होत नाही, त्यांच्या शुश्रषेची आबाळ होते, याकरितां सार्वजनिक रुग्णालये प्रस्थापित करण्याचे श्रेय त्यांनी मिळविले आहे. इ. स. १२८५ मध्ये सुलतान मन्सूरनें एक भव्य रुग्णालय बांधण्यास सुरुवात केली व तें कार्य त्याचा मलगा नझीर याने १२९३ मध्ये परिपूर्ण केले. या रुग्णालयांत सर्व प्रकारची व्यवस्था ठेवण्यांत आली होती. एकाद्या राजप्रासादास लाजवील अशा प्रकारची आरामपूर्ण व्यवस्था त्या रुग्णालयामध्ये असे. रोग्यांना आल्हाद बाटण्याकरितां मधुर वाद्यांचे गोड आलाप दिवसभर ऐकू येत. जोसेफ हेल म्हणतो:
 "राजे लोकांच्या राजमहालाप्रमाणे त्या रुग्णालयांत ठिकठिकाणी खळखळणारे निर्झर दृष्टीस पडत व दिवसभर गोड वाथै चाजविली जात.*

 या रुग्णालयांचा खर्च खलिफा आपल्या खासगी पैशांमधून करीत. सुप्रसिद्ध ज्यू प्रवासी बेंजामिन हा १२ व्या शतकात बगदाद येथे गेला असता त्याला बगदाद शहरांत सहा सुसज्ज व ऐश्वर्यपूर्ण अशी रुग्णालये आढळून आली. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे रोगी बरा होऊन रुग्णालयाबाहेर आल्यानंतर त्याला पांच सोन्याची नाणी देण्यांत येत. काही दिवस तरा परिश्रम न करितां त्यां रोग्याला राहतां यावे हाच उद्देश या औदार्याच्या बुडाशी होता. स्त्रियांच्याकरितां खास “ जनाना रुग्णालये" त्याच काळीं अस्तित्वात आली. या सर्व रुग्णालयांचे


The Arab Civilization, Page 117