पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

१९५



 होता आणि त्याने त्या काळी केलेल्या शस्त्रक्रिया आजच्या शस्त्र-- क्रियेच्या पद्धतीशी साम्य दर्शवितात."

-स्टॅन्ले लेनपूल


 अबुल कासीम ( इ. स. १०१३-११०६) हे तर त्या काळी नणात शस्त्रवैद्य समजले जात असत. त्यांनी शस्त्रक्रियेत इतकें विलक्षण प्रावीण्य संपादन केले होते की यरोपखंडांतील सर्व देशांतून उदयोन्मुख तरुण शस्त्रक्रिया शिकण्याकरितां त्यांच्याजवळ येत. त्यांच्या हाताखाली शिकून गेलेल्या शस्त्रवैद्यांनीच युरोपमध्ये जाऊन पक्रया करण्यास सुरुवात केली. युरोपियन ग्रथकारानी त्रक्रियेचा प्रणेता ' अशी मानाची संज्ञा दिली आहे. अबल कासीम हे पाश्चात्य देशांत A bulcasis या नावाने सुविख्यात पावले आहेत. एक ग्रंथकार म्हणतो:-

 "मध्ययुगीन काळांत अबुल कासीम हे अत्यंत विख्यात शस्त्रवैद्य आहेत असे सर्वत्र मानले जाई."*

जोसेफ हेल


 अबुल कासीम यांनी केलेल्या अनेक शस्त्रक्रियांची एक जंत्री ठवण्यांत आली आहे. शस्त्रक्रिया करण्याकरितां वापरण्यांत या शस्त्रांना त्यांनी जी नांवें दिली आहेत ती अद्यापही चाल त. 'अल-तसरीफ' हे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचें नांव असून तो ग्रंथ तीस भागांत विभागला आहे.

 अरब लोकांनी वैद्यकशास्त्रात वैद्यकशास्त्रांत आणखी एका अभिनव कल्पनेचा


† Moors in Spain, P. 144.


*The Arab Civilization, P. 97.