पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९४
इस्लाम आणि संस्कृति



कार म्हणतो, ' ज्या वेळी आजचा पुढारलेला युरोप हजारों वर्षे मागासलेला होता व तेथे दंतरोग असू शकतो याची कल्पनाही नव्हती त्या काळी मुस्लिमांच्या पदरीं कुशल व तज्ज्ञ दंतवैद्य होते. इनॉक्युलेशन करण्याची प्रथा कॉन्स्टॅटिनोपल येथे मुस्लिमांनी प्रथम सुरू केली. तेथून लेडी मेरी माँटेग्यू नांवाच्या स्त्रीने १७२१ सालांत ती इंग्लंडमध्ये सुरू केली; त्या वेळी पाद्री लोकांनी व धर्मपंडितांनी इनॉक्युलेशन विरुद्ध केवढे काहूर उठविले होते हे वाचकांना माहीत असेलच.

 "प्राचीन लोकांस अगम्य असणाऱ्या अनेक शस्त्रक्रिया अरव । लोक करीत असत."*
शस्त्रक्रियेचे अरब लोक प्रणेते मानले जातात, औषधांना दाद न देणारे असाध्य रोग शस्त्रक्रिया करून बरे करण्याचा प्रघात पहिल्या प्रथम अरबांनी केला ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करतांना रोग्यास वेदना होऊ नयेत म्हणून त्याला भूल (Tare) देण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. त्या काळी शस्त्रक्रियेत अरबांनी इतकी पारंगतता मिळविली होती की अखिल युरोपमधील लोक, खलिफांच्या दरबारी असणाऱ्या मुस्लिम डॉक्टरांकडे येत. आजच्या सुधारलेल्या काळांतील शस्त्रक्रिया व अरब लोकांनी ११ व्या शतकांत केलेल्या शस्त्रक्रिया यांत साम्य दिसून येते. यावरून अरबांनी शस्त्रक्रियेत केवढें नैपुण्य मिळविले असेल याची आपणांस कल्पना येते. एक ग्रंथकार म्हणतो :--

 "अबुल कासीम हा अकराव्या शतकांतील विख्यात शस्त्रवैद्य


* Historian's History of the World, Vol. 8, P. 280.