पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

१९३


करण्याचे कार्य सुरूंच होते. प्रयोगशाळेंत औषधांचे प्रयोग करून त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचे कार्य अरब लोकांनी प्रथमच केलें. लोकांची फसवणूक करणारी नकली औषधे बाजारांत विकली जाऊं नयेत याबद्दल विलक्षण दक्षता घेतली जात असे. एक ग्रंथकार म्हणतो, “औषधे तयार कशी करावी याची पुस्तकें प्रसिद्ध करण्याचे श्रेय अरब लोकांनी प्रथम घेतले आहे. औषधे तयार करून विकणारी दुकानें मॅजिस्टेटच्या सक्त देखरेखेखाली चालत. अस्सल चीजा वापरल्या आहेत किंवा नाहीत व ती योग्य किमतीस विकली जातात किंवा कसे या गोष्टींवर मॅजिस्टेटचे लक्ष असे."* वाटेल त्याने उठावें व वाटेल ती औषधे तयार करावी आणि विकावी असा आंधळा कारभार नव्हता. तज्ज्ञांकडून औषधे तयार करून घ्यावयाची आणि ज्यांना परवाने असतील त्याच दुकानदारांनी ती योग्य किंमतीस विकावयाची ही पद्धत मस्लिम अमदानींत सर्वत्र रूढ होती.

 दांतांच्या रोगाचे बरोबर निदान करून त्यावर उपाययोजना करावयाचे महत्त्वाचे कार्य अरबांनीच सुरू केले. दांत दुखू लागला की तो ईश्वरी कोप समजून त्यावर चमत्कारिक व हास्यास्पद उपाय जना करण्याचा प्रघात त्या काळी युरोपमध्ये होता; पण अरब लोक दंतरोगावर औषधी पाण्याने चुळा भरून जंतुविनाशक आषधांचा उपयोग करीत. किडलेला दांत काढून त्यामळे झालेली पाकळी भरून काढीत. पायोरिया नांवाच्या भयंकर दंतरोगाचा पाय अबुल कासीम या विख्यात शास्त्रज्ञाने प्रथम लाविला. एक ग्रंथ-


* Beckmann's History of Inventions, Vol. II. P. 122
इ.सं.१३