पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९२
इस्लाम आणि संस्कृति


( Mainonides ) या शास्त्रज्ञानी आहार व आरोग्य यांवर ग्रंथरचना केली आहे. विषबाधा व त्यावर उपाय यावरही त्यांनी विस्तृत प्रबंध लिहिला आहे. सुलतान सलाहुद्दीन यांच्या दरबारी प्रमुख हकीम म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. इब्न वफीद ( Aben guifit ) यांनी · रोगावर सोपे उपाय ' या नांवाचे पुस्तक लिहिले असून त्या उपयुक्त पुस्तकाच्या अल्पावधीत साठ आवृत्त्या निघाल्या आहेत. अरीब इब्न सैद अल खतीब हे तर स्त्रियांच्या रोगाचे तज्ज्ञ म्हणून ख्यात होते. गर्भाची वाढ व गर्भवती स्त्रियांची निगा यांवर त्यांनी विद्वत्तापूर्ण प्रबंध लिहिला आहे. अबुल हसन इब्न हैबतुल्ला नांवाचा शास्त्रज्ञ विशेष ख्यात आहे. मानवाच्या उत्पत्तीवर त्यांनी “ मकुला फी खलकिल इन्सान " नांवाचा ग्रंथ लिहिला असून शेवटच्या पन्नास प्रकरणांत त्यांनी मानसशास्त्राचा विचार केला आहे. जयनुदिन इस्माईल यांनी एक प्रचंड ग्रंथ लिहिला असून अबू सीनाकृत अल काननच्या खालोखाल या ग्रंथाची योग्यता आहे. या ग्रंथाचे दहा भाग करण्यांत आले आहेत. यांखेरीज आणखी कितीतरी मुस्लिम विद्वानांनी वैद्यकशास्त्रावर ग्रंथ लिहून ठेविले आहेत. एक ग्रंथकार म्हणतो, " एफ. डस्टनफील्ड (इ. स. १८०८-१८९९) यांनी वैद्यकशास्त्रावर ग्रंथ लिहिणारे ३०० वर मुस्लिम विद्वान् होते असे नमूद केले आहे. अॅडॉल्फ फौंटन यांनी आपल्या Zur Quellen kunde der persische ' या ग्रंथांत नुसत्या इराणी भाषेतच मस्लिमांनी ४०० ग्रंथ वैद्यकशास्त्रावर लिहिले आहेत अशी माहिती सांपडते."

 निरनिराळ्या रोगांच्या संशोधनाबरोबर मुस्लिमांचें औषधे तयार


+ Outline of Islamic Culture, Vol. I, P. 193.