पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

१८९


गत्यंतरच नव्हते. एक ग्रंथकार म्हणतो, " अरबांनी वैद्यकशास्त्र अरबी भाषेत आणलें म्हणून आपण अल मन्सरचे आभारी राहिले. पाहिजे. त्याने Gorge Baktishus नांवाच्या विद्वानाकडून ग्रीक, सिरियन आणि पर्शियन भाषेमध्ये असणाऱ्या अनेक वैद्यक ग्रंथांचें अरबी भाषेमध्ये भाषांतर करविलें."* नुसती भाषांतरें करून स्वस्थ न बसतां अरबांनी त्या शास्त्रावर स्वतंत्रपणे अनेक ग्रंथ लिहून ते. प्रसिद्ध केले. अबू बक्र महम्मद इब्न झकरिया अल-राझी (इ. स. ८६५-९२५) नांवाचे वैद्यकशास्त्रांत पारंगत असे विद्वान् होऊन गल. युरोपमध्ये ते Razes या नांवाने सुविख्यात आहेत. खलिफा. अल-मन्सूरी यांनी त्यांना उदार आश्रय देऊन त्यांच्याकडून 'वैद्यकशास्त्राचा ज्ञानकोश' लिहवून घेतला. या ज्ञानकोशाचे दहा खंड माहित. या शिवाय अल-राझी यांनी वैद्यकशास्त्रावर २०० ग्रंथ लाहले आहेत. त्यांपैकी बऱ्याच ग्रंथांची भाषांतरें व्हेनिसमध्ये १९१० साली प्रसिद्धिली गेली. त्यांचा महत्त्वाचा प्रबंध म्हणजे दवीचा आजार व त्यावर उपाय" हा होय. या अरबी भाषेतील अबधाची ग्रीनहिलकड़न इ. स. १८४७ साली ग्रीक, लॅटिन, जमेन व इंग्रजी भाषांमध्ये भाषांतरें प्रसिद्ध करण्यांत आली. देवीच्या आजारावर संशोधन करणारा पहिला शास्त्रज्ञ म्हणून अल राझींची कीर्ति चिरंजीव होऊन राहिली आहे.

 अल तबरी (इ. स. ९९४) नांवाच्या शास्त्रज्ञाने 'फिरदौस-उलहिकमत' नांवाचा अभतपूर्व ग्रंथ लिहिला असून तो सात भागांत विभागला आहे. अली बिन अब्बासनें 'किताब-इ-मालकी' नांवाचा


* Friend's History of Medicine, Vol. II.