पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८८
इस्लाम आणि संस्कृति



मानवतेची अपूर्व सेवा असे मानले जाते. रोगराईमुळे त्रस्त झालेल्या जगास त्यांच्या प्रयत्नामुळे आराम व विसांवा मिळाला आहे. रोगाचे बरोबर निदान करणे, त्यावर रामबाण इलाज शोधून काढणे, निरनिराळ्या रोगराईचे संशोधन करून प्रतिबंधक स्वरूपाची उपाययोजना करणे, रोग्यांची योग्य निगा राहावी म्हणून रुग्णालयाचा स्थापना करणे अशा अनेक संस्मरणीय गोष्टी अरब लोकांनी वैद्यकशास्त्रांत करून ठेवल्या आहेत. ज्या काळी रोगराई आली म्हणज युरोपमधील लोक नवस व अंगारेधुपारे करीत त्या काळी रोगाच बरोबर निदान करून त्यावर औषधोपचार करण्याची पद्धत पाहिली म्हणजे अरब लोक किती सुधारलेले व आघाडीवरचे लोक हात आणि वैद्यकज्ञानाबद्दल केवढी आस्था वाटत होती हे सिद्ध होत. प्रसिद्ध ग्रंथकार एडवर्ड गिबन याने "वैद्यकशास्त्राचा विचार केला असतां अरब लोकांची मक्त कंठाने प्रशंसाच करणे योग्य ठरेल " असें त्यांच्याबद्दल उद्गार काढले आहेत.

 अरबांनी वैद्यकशास्त्राचे ज्ञान ग्रीक व सीरियन लोकांपासून घेतले तरी त्यामध्ये त्यांनी एवढी भर घातली आहे की अरब लोकच वैद्यकशास्त्राचे प्रणेते आहेत असे समजले जाते. जातिधर्माचा विचार न करता त्यांनी मस्लिमेतर विद्वानांस उदार आश्रय देऊन त्यांच्याकडून ग्रीक, सीरियन, पर्शियन भाषेतील वैद्यकशास्त्रावरील बहुमोल ग्रंथांचे अरबीमध्ये भाषांतर करवून घेतले. त्या काळी अल-मन्सरनें अरबी भाषेत वैद्यकशास्त्रावर अमूल्य ग्रंथसंभार निर्माण केला. १७ व्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ पांचशे वर्षे युरोपमध्ये वैद्यकशास्त्राची भाषा अरबी होती. वैद्यकशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारास प्रथम अरबी भाषेचा अभ्यास केल्यावांचून