पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०
इस्लाम आणि संस्कृति



 ग्रन्थ प्रसिद्ध केला असून तो वैद्यकशास्त्रावरील महत्त्वाचा ग्रन्थ समजला जातो.

 दहाव्या शतकांत अबू सीना (इ. स. ९८०-१०३७) नांवाचे विद्वान शास्त्रज्ञ जन्मास आले. त्यांचे संपूर्ण नांव अबू अली-हुसेन इब्न अबदुल्ला इब्न सीना असे असून ते युरोपमध्ये Avicenna या नांवानें प्रख्यातीस आले. त्यांच्यासारखा वैद्यक शास्त्राचा अभ्यासू विद्वान झाला नाही असे म्हणतात. युरोपियन वैद्यक शास्त्रांत त्यांना आपले नांव अजरामर करून ठेविले आहे. एक ग्रंथकार म्हणतो :-

 " अरब लोकांचा गॅलन ( Galen ) म्हणून अबू सीना यांना संबोधिले जाते आणि खरोखरीच जगांत होऊन गेलेल्या अव्वल दर्जाच्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना केली जाते."*

 त्यांचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ अल-कानन (Canor Medicine) अरबी भाषेत रोम शहरी प्रसिद्ध झाला. त्याची अन भाषांतरें झाली आहेत. वैद्यक शास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा ग्रन्थ म्हणून त्याची कीर्ति आहे. एक ग्रंथकार म्हणतो, “सोळाव्या शतकामध्य युरोपमधील विश्वविद्यालयांत अल-राझीचा ज्ञानकोश आणि अबू सीनाचा अल-कानन या दोन ग्रंथांवरच आधारलेली व्याख्याने हात असत."

 अबू सीना नंतर अबुल वलीद मोहम्मद इब्न रुश्द (इ. स. ११ २०-११९८) नांवाचे शास्त्रज्ञ स्पेनमध्ये होऊन गेले. ते युरोपमध्ये


* Europe's Debt to Islam by Zaidi, P. 23.


+ The Arab Civilization by Joseph Hell, P. 91.