पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

१८५


करण्यांत दाखविलेली बुद्धिमत्ता प्रशंसनीय आहे असे म्हणावें लागेल."*

 गणितशास्त्राच्या एका महान् अभ्यासचे वरील उद्गार वाचल्या तर त्या क्षेत्रांत अरबांनी केवढें उल्लेखनीय कार्य करून ठेविलें जाह याची आपणांस कल्पना येईल, अरब लोकांनी गणितशास्त्राचे ज्ञान जरी ग्रीक लोकांपासन घेतले तरी त्यांत त्यांनी पुष्कळ धारणा केल्या व नवीन पद्धति निर्माण केल्या. या शास्त्रात परवाना केलेले संशोधन प्रशंसनीय मानले जाते. हिंदी अंकगणित ना अत्यंत व्यवहार्य वाटल्यामळे तिचा अंगीकार केला आणि विषयावर पुष्कळ संशोधन करून त्यांनी अनेक पुस्तकें लिहून ठेविली आहेत.

 बाजगणिताचे ( Algebra ) उत्पादक अरब आहेत असें पक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ज्या विज्ञान् अरब गृहस्थाने गाणताचा शोध लावला त्याच गृहस्थाच्या नांवानें (अल जबर) यापही बीजगणिताचा उल्लेख केला जातो. साबित बिन कुर्राण मोहम्मद बिन मसा या दोन शास्त्रज्ञांनी बीजगणितास पस्थित स्वरूप दिले. उमर बिन इब्राहीम या गणितज्ञाने बीजणितावर एक महत्त्वाचा प्रबंध लिहिला आहे आणि हा प्रबंध तिलिखित स्वरूपांत लीडन युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत पचापही पहावयास मिळतो. डॉ. डेपर यांनी 'बीजगणिताचें मूळ शान आम्ही अरब लोकांपासन घेतले आहे.* असे उद्गार काढले आहेत.


* Montucla, Hist. de Mathematiques, Vol. 1, P. 362.


* History of the Conflict between Religion & Science


by Dr. Draper, Page 305.