पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८४
इस्लाम आणि संस्कृति


वनस्पतिशास्त्र समृद्ध करून टाकिलें आहे. क्रोडोवा, फेज, कायरो आणि बगदाद या शहरी, वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्याकरिता मोठमोठे बगीचे तयार करण्यांत आले होते. राझी, अली बिन इब्न अब्बास आणि अबू सीना हे वनस्पतिशास्त्रज्ञ मोठ्या. योग्यतेचे समजले जातात. इब्नुल बैतार (इ. स. १२४८ ) यांची तर सर्व वनस्पतिशास्त्रज्ञांचा मुकुटमणि अशी कीर्ति आहे. त्यांनी युरोप, आफ्रिका व आशिया खंडांत प्रवास केला असून या विषयावर तीन महान् ग्रंथ लिहिले आहेत. एका ग्रंथांत वनस्पतींच्या गुणदोषांची चर्चा केली आहे. दुसऱ्या ग्रंथांत खनिज वस्तूची सविस्तर माहिती दिली आहे. तिसऱ्या ग्रंथांत प्राण्यांचा इतिहास दिला आहे. या शास्त्रज्ञाविषयी जेम्स मर्फे नांवाच्या पाश्चात्य ग्रंथकाराने पुढीलप्रमाणे गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत, “ वनस्पतिशास्त्राची माहिती मिळविण्याकरितां त्यांनी युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडाताल प्रत्येक भागांत प्रवास केला. निसर्गाच्या तिन्ही राज्यांतील ( वनस्पति, खनिज व प्राणिशास्त्र) प्रत्येक दुर्मिळ चीज काळजीपूर्वक पाहून त्याची चिकित्सा केली आणि पौर्वात्य व पाश्चिमात्य देशांतून ज्ञानाची संपत्ति आपल्या माहेरघरी आणली." या मुस्लिम शास्त्रज्ञांचा पुढे इतका गौरव करण्यांत आला की त्यांना दमास्कसच मुख्य प्रधान नेमण्यांत आले. इ. स. १२४८ साली ते त्याच शहरा कालवश झाले. नामवंत अरब शास्त्रज्ञांची व्यवस्थित माहिता Haller's Bibliotheca Botanica या ग्रंथांत सांपडते.

गणितशास्त्र


 "गणितशास्त्राच्या मुख्य मुख्य शाखांचा विचार केला असतां, त्यांनी (अरब लोकांनी) नवीन शोध लावण्यांत अथवा सुधारणा