पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

१८३



व्हलेंटाईन, टॉमस नॉर्टन, परसेल्सस, हेल्मांट, ग्लावर, हेलवेसियस आदि विख्यात रसायनशास्त्रज्ञांनी अरब शास्त्रज्ञांचे ऋण कबूल केले आहे.

प्राणिशास्त्र व वनस्पतिशास्त्र


 “प्राणिशास्त्र व वनस्पतीशास्त्र यांचा सखोल अभ्यास करून त्या शास्त्रात अरब लोकांनी यशस्वी प्रगती करून दाखविली आहे.* जस उद्गार एका ग्रंथकाने काढले आहेत. वरील निसर्गशास्त्रांत मुस्लिमांनी केलेली कामगिरी, पुढे होणाऱ्या शास्त्रज्ञांस मार्गदर्शक ऊन राहिली आहे. या विषयांवर त्यांनी लिहिलेली पुस्तकें काळजीपूर्वक अभ्यासली जातात. अल-दमरी या शास्त्रज्ञाने प्राणिस्त्रिावर एक महत्त्वाचा ग्रंथ लिहून अजरामर कीर्ति मिळविली आहे. । प्रसिद्ध ग्रंथ बफनच्या ७०० वर्षे अगोदर लिहिला आहे. अबू मान या शास्त्रज्ञाने प्राण्यांचा सविस्तर इतिहास लिहिला असून सामध्य अनेक पशपक्ष्यांची साद्यंत माहिती सांपडते. अल-बरुनी पना हिंदुस्तानांत चाळीस वर्षे प्रवास करून निरनिराळे प्राणी व नज वस्तु यांची माहिती व गुणविशेष यांविषयी एक ग्रंथ लाहला आहे. या शिवाय त्यांनी Precious Stones वर लिहिलेला अबध निसर्गशास्त्रांत महत्त्वाचा समजला जातो. प्राणिशास्त्राचे यथातथ्य ज्ञान होण्याकरितां मुस्लिमांनी पशुपक्ष्यांची अनेक संग्रहालये प्रस्थापित केली होती.

 वनस्पतिशास्त्रांत ( Botany ) तर अरब लोकांनी मोलाची भर गतला आहे. वनस्पतींच्या दोन हजार जातींचा शोध लावून त्यांनी


* History of Mohamadan Empire in Spain, P. 247.