पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

१८१



आहेत. नैट्रिक अॅसिड, सलफ्रयूक अॅसिड, अल्कोहोल या महत्त्वाच्या द्रव्यांचा त्यांनीच शोध लावला."*

 रसायन शास्त्राच्या क्षेत्रांत पुस्लिमांनी जे असामान्य कार्य केलें तें कदापिही विसरले जाणार नाही. मानवी जीवन सौख्यपूर्ण व समृद्ध करणारी जी शास्त्रे आहेत त्यांमध्ये रसायनशास्त्राला अग्रेसरत्वाचा मान द्यावा लागेल. या दृष्टीने रसायनशास्त्रास शास्त्राणां शास्त्र मुत्तमम् ' असें यथार्थतेने म्हटले जाते. आपणांस रोगमुक्त करणाऱ्या औषधी, आपले जीवन सुखमय करणारी साधनें, आपली रंगीबेरंगी व आकर्षक वस्त्रप्रावरणें ही रसायन शास्त्रामुळेच जगास प्राप्त झाली आहेत. सोने, रुपें, रेडियम इत्यादि धातु, औषधे, रंग, खत, कृत्रिम रत्ने, कांच, अत्तरें, कागद, कातडी, तेल, चरबी, साबण, रबर, कृत्रिन रेशीम, तंबाकू, शाई, आगपेटया, चुना, सिमेंट इत्यादि बहुमोल पदार्थ, गंधकाम्ल, लवणाम्ल इत्यादि आम्लें ही सारी 'रसायन शास्त्राची' सत्कृति आहे.

 आधनिक रसायन शास्त्राचे जनकत्व अरबांकडे जातें अशी कबुली आजकालच्या प्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञांनी दिली आहे. हॅडोक्लोरिक ऑसिड, नैटिक अॅसिड, सल्फयक असिड, आल्कोहला ही महत्त्वाची रसानिक द्रव्ये अरबांनी शोधून काढली. रसायनशास्त्रास आवश्यक असणारी उपकरणे त्यांनी तयार केली. बाष्पशद्धिकरण (Distillation) उर्ध्वपातन (Sublimation) यां-


* History of the Confict of Religion & Science by Dr. Draper, P. 116-17.


† “ History of the Conflict between Religion & Science" by Dr. Draper, P. 116-17.