पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८०
इस्लाम आणि संस्कृति


मुस्लिमांनी खगोल शास्त्राच्या क्षेत्रांत जी संस्मरणीय कामगिरी करून ठेवली आहे, त्यासंबंधी लिहितांना डॉ. डेपर म्हणतो, "खगोलशास्त्रासंबंधी विचार केला तर असे दिसून येईल की त्यांनी ग्रहांची केवळ जंत्री न करतां, नभोमंडळांत दृश्य असणाऱ्या ताऱ्यांचे नकाशेही बनविले. त्यांपैकी आकारमानाने मोठया असणाऱ्या ग्रहांना त्यांनी जी अरबी नांवें दिली ती अद्याप प्रचलित आहेत. त्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाची मोजणी करून तिचे आकारमान ठरविले; तसेंच परमक्रांती वृत्ताची कल्पना बांधली. सूर्यचंद्राच्या गतीची शुद्ध कोष्टके छापली व वर्षाच्या कालमर्यादा ठरवून विषुवअयनांशांचा पडताळा पाहिला. ला प्लेसने अल-बत्तानीच्या ग्रहशास्त्र या ग्रंथाबद्दल गौरवपर उद्गार काढले आहेत. इ. स. १००० मधील इजिप्तच्या खलिफाचा आश्रित इब्न युनूस यान लावलेल्या एका महत्त्वाच्या शोधाकडे नजर टाकण्यास सुचविले आहे. त्यांत अल-मन्सूरच्या वेळी तारांचे अस्त, ग्रहांच्या युती, अयनान्त, विषुव व ग्रहणासंबंधी घेतलेल्या बऱ्याच वेधांचा उल्लेख आढळता. त्यामुळे खगोलाच्या मोठमोठया घडामोडींचा अर्थ लावता येतो. अरब खगोलवेत्त्यांनी जोतियंत्रांची रचना करणे व त्यांना पूर्णत्वास नेण सूर्यतबकडीसारख्या निरनिराळ्या साधनांनी कालमापन करणे वगर गोष्टीत आपलें तनमनधन खर्च केले आहे. कालमापनाला लंबकाचा त्यांनीच प्रथम उपयोग केला."

रसायनशास्त्र


" प्रयोगात्मक शास्त्रापैकी रसायनशास्त्राचे अरब लोक उत्पादक



+ History of the Conflict between Religion & Science, Page 116.