पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
इस्लाम आणि संस्कृति




केला. इराणमध्ये सैन्य घुसवून तेहरान, हमदान व इस्पहान इत्यादि मोठी शहरें हस्तगत केली. रोमन साम्राज्याला टक्कर देऊन, इजिप्त सर केला. उत्तर आफ्रिकेवर मोहीम करून बरका व टिपोली ताव्यांत घेतली. तिकडे सिरियामधून आर्मेनिया व जॉर्जियावर कबजा केला. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायप्रस बेटावर समुद्रामधून हल्ला चढवून त्यावर आपले निशाण फडकावले. राज्याचा हा वाढता पसारा पाहून हजरत उमर यांनी ठिकठिकाणी लष्करी केंद्रे प्रस्थापित केली आणि आपल्या सैन्याची नव्या धर्तीवर रचना केली.

 विजयामुळे एक प्रकारची मस्त निशा सैन्यामध्ये फैलावते, तिला आळा घालण्याची खबरदारी हजरत उमर व त्यांच्या नंतरच्या खलिफांनी घेतली होती. इस्लाम धर्मातील सहिष्णुता व मानवता या दोन महान तत्त्वांचा विसर मुस्लिम सैन्याला पडतां कामा नये असा त्यांचा कटाक्ष होता. मुलुखगिरी करावयास निघालेल्या आपल्या सैन्यास “ जनतेशी अदबीने वागा; वृद्ध, स्त्रिया, आणि मुले यांच्या2. वर हत्यार उगारूं नका; नागरिकांची घरेंदारें व पिके ७२ उध्वस्त करूं नका." असा संदेश देत. देश पादाक्रांत केल्या नंतर, तेथील नागरिकांना अत्यंत सहिष्णुतेने वागविण्यांत येई. ते परधर्मीय म्हणून त्यांचा कधीही छळ करण्यांत येत नसे; उलट शाही फर्मान काढून त्यांचे सर्व हक्क अबाधित राखले जात. त्यांच्या धर्मांत ढवळाढवळ करण्याचे किंवा जबरदस्तीने आपला धर्म लादण्याचे पाप कधीही होत नसे. सुप्रसिद्ध इतिहासकार गिबन याने “रोमन साम्राज्याचा उदयास्त ' या आपल्या ग्रंथांत एके ठिकाणी काढलेले उद्गार मनन करण्यासारखे आहेत. तो म्हणतो, " जेरूसलेम ज्या वेळी उमर खलिफाच्या स्वाधीन करण्यांत आले, त्या वेळी