पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

१७९


स्वतःच्या उपयोगाकरितां एक वेधशाळा उभारली होती. शरफुदिन बिन आजादुद्दौला यांनी तर अनेक तज्ज्ञ खगोलशास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली स्वत:च्या बागेमध्ये वेधशाळा बांधली होती. सीरिया व स्पेनच्या राज्यकर्त्यांनी आपआपल्या देशांत वेधशाळा बांधल्या होत्या. सर्वांत उत्कृष्ट वेधशाळा ईजिप्तमध्ये असन तिचें नांव 'रसदे हाकमी' असे आहे. स्पेनमधील वेधशाळेचा मात्र धर्मयुद्ध करणाऱ्या खिश्चन लोकांनी नाश करून टाकला. तैमूरचा नातू उलूघबेग यालाही पण खगोलशास्त्राची आवड होती. त्यांनी घियासुद्दीनला हुकूम देऊन समरकंद येथे ( इ. स. १४३७) एक प्रचंड वेधशाळा बांधविली. रशियाच्या पुराणवस्तु संशोधन खात्याने सन १९०० साली या वेधशाळेचा शोध लाविला. सुलतान मुरादने तुर्कस्थानांत बेधशाळा बांधण्यास तकीऊद्दीन यांस फर्माविलें. पण तेथील सनातनी मल्लांच्या विरोधामुळे तें कार्य तसेंच अर्धवट राहिले, हिंदुस्थानामध्ये मुहम्मदशहाच्या कारकीर्दीत (१७१९-४८) दिल्ली येथे नजमदिन याने वेधशाळा बांधली. राजा जयसिंगानें बनारस व जयपूर या शहरी वेधशाळा बांधल्या. त्याच वेळी खगोलशास्त्रावरील अरबी ग्रंथाचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्यांत आले. एक ग्रंथकार म्हणतो, " वेधशाळा उभारण्याची पद्धत मुस्लिमांकड़न यरोपियन लोकांनी घेतली व त्यांत सुधारणा केल्या. खगोलशास्त्रविषयक पुष्कळ उपकरणांचा शोध व त्यांमध्ये सुधारणा मुस्लिम खगोल शास्त्रज्ञांनी केल्या आहेत."* मुस्लिमांनी या विषयावरील ग्रंथसंभार मोठया प्रमाणांत केला आहे. खगोल व वैद्यक शास्त्रावर लिहिलेली ३६०० च्या वर पुस्तकें अद्यापही कैरोच्या लायब्ररीत आढळून येतात.


* Outline of Islamic Culture, Vol. I, Page 180.