पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७८
इस्लाम आणि संस्कृति


भाषांमध्ये झाली आहेत. युरोपमध्ये हे शास्त्रज्ञ Al-bategnus या नांवानें मशहूर आहेत. अबू बक्र नांवाचे तितक्याच तोडींचे शास्त्रज्ञ इराणमध्ये होऊन गेले. ते युरोपमध्ये Albubather या नांवाने ओळखले जातात. त्यांच्या ग्रंथांची लॅटिनमध्ये भाषांतरे झाली आहेत.

 या शास्त्रज्ञांनी ' ताऱ्यांची ओळख ' या नांवाचा ग्रंथ लिहिला असून त्याचेही लॅटिनमध्ये भाषांतर झाले आहे. त्या काळी इराणमध्ये खगोलशास्त्रासंबंधी इतकी आवड उत्पन्न झाली होती की उमर खय्याम या विख्यात कवीनांही खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी या शास्त्रावर अभ्यासपूर्ण अस अनेक लेख लिहिले आहेत. पूर्वीची इराणी दिनदर्शिका बदलून नव्या पद्धतीची दिनदर्शिका त्यांनीच सुरू केली. ग्रीक खगोलशास्त्रज्ञांचे सिद्धांत खोडन काढणारा इब्न युनस नांवाचा शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याच्या 'जीजल अकबर अलहाकिमी' या महार ग्रंथाचे भाषांतर उमर खय्याम यांनी केले आहे. साबित बिन कुरा नांवाच्या शास्त्रज्ञांनी ग्रहांची गती नक्की केली, व सर्याची चक्रगात ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटें व १२ सेकंदांत पुर होते असे सिद्ध केले. आजच्या काळांत हा सिद्धांत बरोबर आहे असे मानले जाते.

 नभोमंडळाची व्यवस्थित पहाणी करण्याकरितां मुस्लिमाना ठिकठिकाणी वेघशाळा बांधल्या. खलिफा मामून यांच्या आज्ञ दमास्कस येथे प्रथम मोठी वेधशाळा बांधण्यात आली. या वध शाळेचे अल फरगानी, अब्बास जोहरी, सय्यद बिन अली आणि खालिद यांच्यासारखे विज्ञान दिग्दर्शक होते. मसा बधूना