पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

१७७


देण्याऱ्या खगोलशास्त्राची अरबांनी अत्यंत कळकळीने जोपासना केली आहे.... त्यांनी खगोलशास्त्राचे मळचे स्वरूप अगदी पालटन टाकलें."t

 इब्राहीम अल-फझरी (इ. स. ७७८) यांनी प्रथमच सूर्य व तारे इत्यादिकांची उंची काढणाऱ्या यंत्राचा शोध लावला. माशाल्ला (इ.स.८१५) यांनी खगोल शास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. खलिफा हारून अल-रशीद यांचा मुख्य ग्रंथपालक फजल नांवाचा विद्वान् गृहस्थ होता. त्याने इराणी भाषेतील कित्येक खगोल शास्त्रावरील ग्रंथांचे अरबीमध्ये भाषांतर करून ठेविले आहे. त्यांचा पुतण्या तर प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ समजला जातो. अली इसा (इ. स. ८३२) यांनी बगदाद व दमास्कस येथे अनेक वेध घेऊन त्यावर आपले विद्वतापर्ण प्रबंध लिहिले आहेत. खलिफा अल मामूनच्या पदरी एक विख्यात खगोलशास्त्रज्ञ होते. ते युरोपमध्ये Alfraganus या नांवाने प्रसिद्ध आहेत. 'खगोल शास्त्राची मलतत्त्वे ' या नांवाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असून लॅटिन भाषेमध्ये त्याच्या अनेक आवत्त्या निघाल्या आहेत. उमर फारूकखान (इ. स. ८१५) या इराणी विद्वानांनी खगोल शास्त्रावरील अनेक इराणी ग्रंथांचे अरबी भाषांतर केले आहे. अबू मशर जाफर (इ. स. ८८६) यांनी 'किताबुल मदखल' नांवाचा ग्रंथ लिहिला असून युरोपियन खगोल शास्त्रज्ञांनी त्या गंशाची विलक्षण स्तुति केली आहे. सदर विद्वान गहस्थ योपसमें Albumasar नांवानें ख्यात आहेत. अल बतानी (इस ९२९) हे सर्वांत श्रेष्ठ मुस्लिम खगोलशास्त्रज्ञ समजले जातात. त्यांनी खगोलशास्त्रावर लिहिलेल्या अनेक ग्रन्थांची भाषांतरें युरोपियन


+ Historical Roll of Islam, Page 79.


इ.सं.१२