पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०
इस्लाम आणि संस्कृति



आवृत्ति त्यांनी प्रसिद्ध केली आहे.. त्यांच्या असामान्य विद्वत्तेबद्दल एका ग्रंथकाराने पुढील गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. तो लिहितो, " तत्त्वज्ञानाचा अभ्यास गणितावर आधारला पाहिजे, तो निव्वळ काल्पनिक अनुमान असं नये. अमूर्त विचारास तर्कशुद्ध विचाराचे पाठबळ असावे आणि त्याला आधार मूर्त सिद्धांत, नियम व उदाहरण यांचा असला म्हणजे योग्य अनुमाने काढतां येतात. या नियमांनी अभ्यास व विचार करावा असे सांगणारा हा तत्त्वज्ञ बेकन व डेकॉर्टिस यांच्यापूर्वी सातशे वर्षे होऊन गेला हे मुस्लिम संस्कृतीला किती तरी गौरवास्पद आहे. एक हजार वर्षांपूर्वी अरब तत्त्वज्ञान्यान केलेला हा उपदेश आजही पुष्कळ तत्त्ववेत्त्यांना लाभदायक झाल्याखेरीज राहणार नाही."*

 अल फराबी हे दुसरे महान् मुस्लिम तत्त्वज्ञ असून त्यांचे सपूण नांव अबू नसर मोहम्मद आहे. त्यांचा जन्म नवव्या शतकाच्या अखेरीस इराणमध्ये झाला. आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी इ. स. ९५० साली त्यांनी इहलोकीची यात्रा संपविली. त्यांचे वडाल सैन्यांत मोठे अधिकारी होते. कोवळ्या वयांतच त्यांनी आपला मातृभूमि सोडली व बगदाद येथे प्रयाण केले. त्या ठिकाणी त्याना अरबी भाषा व तर्कशास्त्र यांचा अभ्यास केला. तत्त्वज्ञानाची त्याना अत्यंत आवड असल्यामळे त्याचा अभ्यास करण्याकरितां तं हरत येथील विख्यात विद्यामंदिरांत गेले. अरिस्टॉटल हा त्याचा आवडता तत्त्वज्ञ. त्याच्या ग्रंथांची त्यांनी २०० वेळां पारायण केली. विद्याभ्यास संपविल्यानंतर अल-फराबींनी सीरिया व हाज देशांत खूप प्रवास केला. नंतर ते दमास्कस येथे स्थाईक झाले.


* Historical Roll of Islam; P. 86.