पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि तत्त्वज्ञान

१५९



पुरस्कर्ता सर रॉजर बेकन हा अरब मुस्लिमांचा शिष्य होता. निष्प्रभ व मतप्राय झालेल्या ग्रीक तत्त्वज्ञानाचें मुस्लिमांनी पुनरुज्जीवन केले म्हणूनच युरोपमध्ये बुद्धिवादाचा विकास होऊन धार्मिक अवडंबर व कुजकट मनोवृत्ती यांना मूठमाती मिळाली.

 नवव्या व दहाव्या शतकांत जगामध्ये नामवंत समजले जाणारे बहुतेक सर्व तत्त्वज्ञान मुस्लिमांनी अरबी भाषेत आणिलें. हिंद तत्त्वज्ञानाचा परिचयही अरबी भाषेच्या द्वारेंच 'झाला. त्या काळी मुस्लिम विद्वानांनी तत्त्वज्ञानाचे एवढे प्रचंड ज्ञानभांडार अरबी भाषेत करून ठेविलें की कोणत्याही देशांतील ज्ञान पिपासूला तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याकरितां अरबी भाषेचे प्रथम अध्ययन करावे लागे. तेराव्या शतकापर्यंत म्हणजे ४०० वर्षे, पश्चिम आशिया व युरोपमध्ये अरबी भाषेचे वर्चस्व टिकून राहिले. अकराव्या शतकापासून । मुस्लिमांनी स्वतंत्र्य तत्त्वज्ञान प्रसविण्याचे श्रेय मिळविले आहे. सोळाव्या शतकापर्यंत साऱ्या जगास भूषणभूत होऊन राहणारे अलकिंदी, अल-फराबी, अल-हसन, अबू सीना, इब्न रुश्द, अबू-बक्र, अल-गइझाली यांच्यासारखे महान मुस्लिम तत्त्वज्ञ होऊन गेले.

 अलकंदी हे पहिले स्वतंत्रप्रज्ञ मुस्लिम तत्त्वज्ञानी होत. अब युसफ याकूब हे त्यांचे संपूर्ण नांव असून त्यांचा जन्म नवव्या शतकाच्या सुरुवातीस झाला. त्यांचे वास्तव्य बगदाद शहरी होतें. अव्वल दर्जाचा तत्त्ववेत्ता अशी त्या काळी त्यांची ख्याति होती. त्यांनी निरनिराळ्या विषयांवर २६३ ग्रंथ लिहिले असून 'अरिस्टॉटलचा इतिहास' या अरबी ग्रंथाची सुधारून बाढविलेली


+ Historical Roll of Islam, Page 70.