पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८
इस्लाम आणि संस्कृति



हजरत पैगंबरांच्या मत्यूनंतर जवळजवळ एक शतक, मुस्लिमांनी निरनिराळे प्रदेश पादाक्रांत करण्यांत घालविले. त्या त्या ठिकाणी स्थाईक झाल्यानंतर त्यांनी तत्त्वज्ञान, साहित्य व आधिभौतिक शास्त्र यांचा अभ्यास करण्यांत आपला वेळ खर्च केला. बगदादमध्ये खलिफा अल–मन्सूरच्या कारकिर्दीपासून तो खलिफा अल मामूनच्या कारकिर्दीपर्यंत जगांतील महान तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथांची भाषांतर मुस्लिमांनी अरबी भाषेत केली. पश्चिम आशिया व युरोपमध्य कित्येक शतकें अरबी ही सर्वसामान्य भाषा होऊन राहिली होती. त्यामुळे ग्रीक, इराणी किंवा हिंदु तत्त्वज्ञानाची पाश्चात्य देशांना या अरबी भाषांतरित ग्रंथद्वारेंच ओळख झाली. प्लेटो व अरिस्टॉटल या विख्यात तत्त्वज्ञांची साऱ्या जगास ओळख करून देण्याचा मान प्रथम अरब मुस्लिमांनी मिळविला आहे. अरबी ग्रंथांवरून ग्रीक तत्त्वज्ञानाचे रूपांतर निरनिराळ्या भाषांमधून झालें. एक ग्रंथकार लिहितो. "प्लेटो, अरिस्टॉटल, युक्लिड, अपोलोनिकस व टॉलमा यांचे समग्र ग्रंथ, त्यांचेवरील विषमपद विमर्षिणी' टीकेसाहत नव्या युरोपच्या जनकांना प्रथम अरबी भाषेमधूनच वाचावयास मिळाले."* ग्रीक विद्येचे पुनरुज्जीवन करून मुस्लिमांनी जगावर । केवढे उपकार करून ठेबिले आहेत याचे वर्णन करतांना ता" ग्रंथकार लिहितो, " ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनाने अज्ञान, ला भ्रम व दुराग्रह यांचा नाश केला व युरोपमधील लोकांना एक वैभव, बौद्धिक प्रगती व आध्यात्मिक मुक्ति यांचा मार्ग दाखावल आधुनिक बुद्धिवादाच्या पुरस्कर्त्यांना मस्लिम तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञाकर ग्रीक विद्येचा वारसा मिळाला. आधुनिक शास्त्रसंशोधनाचा आद्य


* Historical Roll of Islam, Page 79.