पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४
इस्लाम आणि संस्कृति


राष्ट्रांत वेदिली फैलावणे किंवा त्याच्या स्वास्थ्यांत बिघाड आणणे हा राष्टद्रोह आहे असे आपण सर्वांनी समजले पाहिजे. स्वदेशाविषयीं, आपल्या राष्टाविषयी अभिमान बाळगणे, आत्यंतिक आदर प्रगट करणे हा एक श्रेष्ठ सदाचार आहे. आपण ज्या राष्टांत जन्म घतला त्या राष्टाविषयी इमान राखणे हे प्रत्येकांचें पवित्र कर्तव्य आहे. एका राष्ट्रांत जन्म घ्यावयाचा, त्या राष्टाचे नागरिक म्हणवावयाचे आणि त्याच राष्टास विघातक होईल अशी नीच कृत्ये करावयाचा हा अधमपणा आहे, अक्षम्य अपराध आहे. अट्टल गुन्हेगाराचा महान् गुन्हा एक वेळ क्षम्य मानतां येईल पण देशाच्या स्वास्थ्यावर निखारे ठेवणाऱ्या गृहस्थाचा देशद्रोहाचा गुन्हा केव्हाही क्षय ठरणार नाही. देशद्रोह म्हणजे एकाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नाह तर सबंध राष्टाविरुद्ध गुन्हा आहे. या गुन्ह्यास कदापिहा मा मिळू शकत नाही. अशा देशद्रोही वृत्तीपासन, फितुरीपणापासून प्रत्येक मुस्लिमानें दूर राहून आपल्या राष्टांची, देशांची अत्यत इमानानें सेवा केली पाहिजे असा इस्लामचा आग्रह आहे.

हुब्बुल वतन मिनल इमान्


म्हणजे राष्टाची, आपल्या मातृदेशाची सेवा हा धर्माचा एक भाग आहे अशी इस्लामची शिकवण आहे. धर्माच्या सर्व शर्ती पाळणारा पण आपल्या स्वदेशाविषयी बेफिकीर राहणारा किंवा त्याची सवा न करणारा शंभर नंबरी मुस्लिम होऊ शकत नाही. स्वदेशाभिमान हा धर्माचा एक भाग असल्यामुळे त्याचे परिपालन झाल्याखेराज धर्म परिपूर्ण होऊच शकत नाही असा इस्लामचा दावा आहे. मुस्लिमाने स्वदेशाभिमान बाळगलाच पाहिजे. पण त्याने स्वदशा भिमान म्हणजे इतर देशांचा द्वेष करणे किंवा साऱ्या जगास तुच्छ